कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या तरूण नेत्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन फार वेगळा आहे. आपल्या कृतीतून ते अनेकांची मने जिंकत असतात. मग जगाने पाठ फिरवलेल्या निर्वासितांना आसरा देणं असो, भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणं असो किंवा तमाम मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देणं असो जस्टिन आपल्या ‘हटके’ अंदाजामुळे भारतीयांचे तर विशेष आवडीचे झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : ‘या’ देशाचे पंतप्रधान राजाला भेटायला सायकलवरून जातात

प्रत्येक भारतीय सणाच्यावेळी ते कॅनडातील भारतीय बांधवांच्या आनंदात आवर्जून सहभागी होतात. मग ती मंदिरातली पूजा असो किंवा कॅनडामधल्या शीख सहकाऱ्यांसोबत बैसाखी साजरी करणं असो. अशा कार्यक्रमात कधी कधी तर पारंपरिक भारतीय पेहरावातही ते दिसतात. त्यामुळे नेहमीच भारतीय सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होतं. पण यावेळी मात्र अनेकजणांनी त्यांना ट्रोल केलं आहे. समस्त भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देणारं ट्विट त्यांनी केलं. पारंपारिक कुडता घालून ते दिवाळीच्या एका कार्यक्रमाला आले होते, पण शुभेच्छा देताना त्याने चुकीचा शब्द वापरला. ‘दिवाली की बधाई’ऐवजी त्यांनी ‘दिवाली मुबारक’ असं ट्विट केलं. त्यामुळे भारतीय चाहते थोडे नाराज झाले. ‘दीपावली की शुभकामनाएँ’, ‘दिवाली की बधाई’ असं बोलून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात असं सांगत त्यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांनी केला.

वाचा : भारतीय वंशाच्या मुलांची प्रेरणादायक कामगिरी, दीड वर्षांत झाला कोट्यधीश

‘मुबारक’ हा अरबी भाषेतून आलेला शब्द आहे. दिवाळीच्या शुभेच्छा अशाप्रकारे दिल्या जात नाही, असं सांगत त्यांच्या ट्विटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर अनेकांनी जस्टिन यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. शब्दापेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत, असे सांगत त्यांनी जस्टिन ट्रुडो यांच्या प्रयत्नाचे कौतुक केले.