Jyoti Maurya Father Reactions: बरेली, उत्तर प्रदेश (यूपी) च्या प्रशासकीय अधिकारी ज्योती मौर्य या मागील कित्येक आठवड्यांपासून चर्चेत आहेत. ज्योती मौर्य यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या दाव्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. ज्योती मौर्य यांचे पती आलोक कुमार यांनी पीसीएस अधिकारी झाल्यानंतर पत्नीने विश्वासघात केल्याचा आरोप लगावला होता. शिवाय दुसऱ्या पुरुषासह अनैतिक नाते संबंध असल्याने पत्नीने आपल्या हत्येचा कट सुद्धा रचला होता असे अनेक दावे ज्योती यांच्या पतीने केले आहेत. तर ज्योती मौर्याने यांनीही अनेकदा मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडली आहे. या प्रकरणात आता पहिल्यांदाच ज्योती मौर्य यांच्या वडिलांची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. ज्योती मौर्य यांच्या वडिलांनी थेट ज्योती यांच्या लग्नाची पत्रिकाच दाखवत आलोक कुमार यांच्यावर आरोप लगावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्योती मौर्य यांचे वडील पारस नाथ मौर्य हे ज्योती मौर्य व आलोक कुमार यांच्या व्हायरल लग्नपत्रिकेबाबत सांगतात की, लग्नादरम्यान आलोकने आपण सफाई कर्मचारी म्हणून काम करत असल्याचे उघड केले नाही. त्याऐवजी आलोक यांनी स्वत: ग्रामपंचायत अधिकारी असल्याचा दावा केला. लग्नपत्रिकेतही त्यांचा ग्रामपंचायत अधिकारी असा उल्लेख होता. लग्नपत्रिकेच्या व्हायरल झालेल्या फोटोत हे पाहायला मिळत आहे.

आलोक मौर्य आता सगळ्यांना जे सांगत आहेत ते लग्नाच्या वेळीस उघडपणे मान्य करायला सुद्धा लाजत होते. आलोक हे सफाई कर्मचारी आहेत, परंतु लग्नापूर्वी ते आणि त्याचे कुटुंब खोटंच सांगत होते. आलोक यांच्या भावाचे म्हणजेच अशोक कुमार यांचे नाव सुद्धा शिक्षक म्हणून देण्यात आले होते पण ते सुद्धाएक सफाई कर्मचारीच आहेत आणि अशा खोट्यावर आधारित लग्नाला असाच परिणाम भोगावा लागतो.

हे ही वाचा<< “माझे प्रायव्हेट फोटो तो…” ज्योती मौर्य यांचे पती आलोकवर पुन्हा आरोप; व्हायरल चॅट्सबाबत मोठा खुलासा

ज्योती मौर्य यांचे वडील उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील चिराईगाव येथे राहतात. मीडियाशी बोलताना सुरुवातीला त्यांनी याबाबत खुलासा करण्यास नकार दिला होता मात्र नंतर त्यांनी स्वतःच आलोक व ज्योती प्रकरणात उघडणपणे प्रतिक्रिया दिली आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyoti maurya father first reaction shows jyoti alok kumar maurya wedding invitation calls alok and family liars know why svs