Jyoti Maurya- Manish Dubey- Alok Kumar Case: यूपीच्या बरेली येथील प्रशासकीय अधिकारी ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांच्यात सुरू असलेल्या वादात मनीष दुबे हे नाव वादाचे मूळ म्हणून समोर येत आहे. ज्योती यांच्यासह विवाहबाह्य संबंध असल्याच्या वादावरून चर्चेत आलेले मनीष दुबे हे होमगार्ड कमांडंट असल्याचे समजतेय. मीडियाशी बोलताना ज्योती मौर्य यांचे पती आलोक यांनी मनीषवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ज्योती आणि मनीषमध्ये अफेअर सुरू होते आणि म्हणूनच दोघांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचाही आरोप आलोक यांनी केला आहे. दुसरीकडे आता आलोक यांनी आपण यासंदर्भात मनीष दुबे यांच्या पत्नीशी सुद्धा कॉलवर चर्चा केली असल्याचे सांगितले आहे.
मनीष दुबे यांच्या पत्नीने काय सांगितलं?
होमगार्ड कमांडंट मनीष दुबे यांच्या पत्नीशी बोलल्याचे ज्योती यांचे पती आलोक यांनी सांगितले. आलोक यांनी आजतकला सांगितले की, मनीष यांच्या पत्नीने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. २०२१ मध्ये लग्न झाल्यापासून मनीष यांची पत्नी स्वतः तणावाखाली जगत आहे. मनीष चांगला माणूस नाही, महिलांसह गैरवर्तन करतो तसेच त्याने आपल्याकडून सुद्धा ८० लाख रुपये मागितले असल्याचा आरोप मनीष यांच्या पत्नीने केला असल्याचे आलोक यांनी सांगितले.
ज्योती मौर्य प्रकरणात मनीष दुबे यांची भूमिका काय?
अलीकडेच महोबा येथे तैनात होमगार्ड कमांडंट मनीष दुबे यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती. मनीष म्हणाले होते की, “जर मी आणि ज्योती सामान्य माणूस असतो तर आम्ही या प्रकरणी नक्कीच बोललो असतो, पण अशा स्थितीत असल्याने मी कॅमेऱ्यासमोर काहीही बोलू शकत नाही. या प्रकरणामुळे ज्योती मौर्यासह राहणे माझ्यासाठी कठीण झाले आहे.”
आज तकच्या माहितीनुसार, आलोक मौर्य यांच्या तक्रारीच्या आधारे विभागीय चौकशी करण्यात आली होती. डीआयजी होमगार्ड संतोष सिंह यांनी मनीष दुबे यांच्याबाबतचा अहवाल डीजी होमगार्ड बीके मौर्य यांना दिला होता. ज्यामध्ये मनीष यांच्याविरुद्ध ३ प्रकरणांचा उल्लेख आहे. सर्वप्रथम मनीष दुबे व ज्योती मौर्य प्रकरणामुळे होमगार्ड विभागाची प्रतिमा डागाळल्याचे म्हटले आहे तसेच याआधारे मनीष यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली होती.
हे ही वाचा<< ज्योती मौर्य यांच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया; ज्योती- आलोकच्या लग्नाची पत्रिका दाखवत म्हणाले, “असंच होणार कारण…”
दुसरे प्रकरण अमरोहाचे आहे, ज्यात एका महिला होमगार्डने मनीष दुबे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने मनीष एकांतात भेटण्यासाठी फोन करायचा, व नकार दिल्यास तिची ड्युटी बंद करायचा असे सांगितले होते. तर तिसऱ्या तक्रारीत मनीष दुबे यांच्या पत्नीचा उल्लेख आहे. मनीषच्या पत्नीचा आरोप आहे की, लग्नानंतर मनीष ८० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली होती.
हे ही वाचा<< “माझे प्रायव्हेट फोटो तो…” ज्योती मौर्य यांचे पती आलोकवर पुन्हा आरोप; व्हायरल चॅट्सबाबत मोठा खुलासा
दरम्यान ज्योती मौर्य व आलोक कुमार यांच्या वादाच्या प्रकरणात १८ऑगस्टला सुनावणी पार पडणार आहे अशी माहिती ज्योती यांनी दिली आहे.