Jyoti Mourya Call Recording: SDM अधिकारी ज्योती मौर्य यांचे पती आलोक मौर्य यांनी होमगार्ड मुख्यालयात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये त्यांच्या पत्नीचे (ज्योती) गाझियाबाद होमगार्डचे कमांडंट मनीष दुबे यांच्याशी प्रेमसंबंध असून ते दोघे त्यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा दावा केला आहे. तर आपल्याकडे दोघांच्या चॅट्सचे स्क्रिनशॉट व कॉल रेकॉर्डिंग असल्याचेही आलोक यांनी सांगितले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर ज्योती व आलोक यांच्यातील कॉलच्या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल होत आहे. नेमकं हे प्रकरण काय आणि या कॉल रेकॉर्डिंगमधून नव्याने काय माहिती समोर आली आहे हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोण आहे ज्योती मौर्य?

ज्योती मौर्य या बरेली येथील प्रांतीय नागरी सेवा अधिकारी आहेत. त्यांचे पती आलोक यांनी दावा केला आहे की या जोडप्याने २०१० मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर ज्योतीने पुढे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आलोकने त्याच्या तुटपुंज्या पगारातून पैसे वाचवून तिच्या कोचिंगसाठी फी भरली, प्रसंगी कर्जही काढले. इतका त्याग केल्यावर जेव्हा ज्योती या अधिकारी झाल्या तेव्हा अन्य एका अधिकाऱ्याशी प्रेम संबंध असल्याने त्यांनी आलोक यांच्यावर हुंडा व छळाचे आरोप करण्यास सुरुवात केली. घटस्फोट देण्यासाठी ज्योती जबरदस्ती करत असल्याचा दावा सुद्धा आलोक यांनी केला आहे. आलोक यांचा हा एक दावा सिद्ध करणारेच एक कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे.

कॉलमध्ये ज्योती म्हणतात की, “मला मनीष सोडेल किंवा नाही पण मला तुमच्याबरोबर राहायचं नाही. तुमच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करायची मला इच्छा नाही, तुम्ही लोकं मला पैसे व गाडी मागून त्रास देत होतात, मला जिथे पुरावा द्यायचा तिथे मी देईनच, तुम्हाला तमाशा करायचा असेल आणि प्रेमाने मला सोडायचं नसेल तर तुम्हाला जे करायचे ते करा, तुम्हाला तपास करायचा असेल करा, माझी नोकरी गेली तरी चालेल हरकत नाही.”

तर यावेळी आलोक यांनी उत्तर दिले की, “मी प्रेम तर सोडणारच नाही, तू माझी बायको आहेस, बायको नेहमीच राहशील. तुलाही माहित आहे की ज्या हुंड्याचं तू नाव घेत असतेस, तू किती हुंडा आणला होतास हे तू ओळखून आहेस. फोनमध्ये वेगळ्या नावाने नंबर सेव्ह करून मनीषला भेटायला जातेस हे काय मला कळत नाही का? तो रात्री १२ वाजता कॉल करतो, चार चार वेळा कॉल करतो, जेव्हा मी उचलला तेव्हा काही बोलत नाही. हे सगळं का घडतंय आम्हाला माहित आहे. “

यावर उत्तर देताना ज्योती म्हणतात की, “तुला हे सगळं घडतंय ते कळत होतं पण जेव्हा तुझ्याकडून प्रेम विश्वास मिळत नाही तेव्हा हे सगळं घडायला लागलं हे कळलं नाही का” या मुद्द्यावर पुढे आलोक आणि ज्योती यांचे संभाषण काय होते हे या रेकॉर्डिंग मध्येच ऐकुया..

ज्योती-आलोक यांचे व्हायरल कॉल रेकॉर्डिंग

दरम्यान, सूत्रांनी दावा केला आहे की आलोक मौर्य यांनी त्यांच्या तक्रारीत अनेक व्हॉट्सअॅप चॅट्स देखील उघड केली, ज्यामध्ये दोन्ही पक्षांनी त्यांच्या हत्येबद्दल चर्चा केली असल्याचे लक्षात आले आहे. हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यापासून ज्योती यांच्याकडून कोणत्याही बाबतील स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही किंवा व्हायरल दावा खोडूनही काढण्यात आलेला नाही. याप्रकरणी पुढील तपास सध्या सुरु आहे, त्यामुळे लोकसत्ता या कॉल रेकॉर्डिंगच्या वैधतेची पुष्टी करत नाही.