सध्या सगळीकडे एकच मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे ज्योती मोर्य यांचा, पुन्हा एकदा तशीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. ज्योती मोर्यच्या प्रकरणाची संपूर्ण देशाला पुनरावृत्ती पाहायला मिळाली. एसडीएम ज्योती मौर्य यांच्याप्रमाणेच बस्तीच्या कप्तानगंज पोलिस ठाण्याच्या धरमसिंहपूर गावातून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. अमित कुमार नावाच्या एक व्यक्तिने आपल्या पत्नीच्या शिक्षणासाठी चक्क शेतीही विकली. पत्नीच्या शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला मात्र याच पत्निने सरकारी नोकरी लागताच अमितची फसवणूक केली. नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमित कुमारचे अर्चनासोबत २०११ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर पत्नीने पतीकडे पुढे शिक्षण घेण्याचा हट्ट धरला. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीने गोरखपूरच्या राज पॅरामेडिकल नर्सिंग कॉलेजमध्ये तिचे अॅडमिशन करुन दिले. पुढे पत्नीच्या शिक्षणासाठी त्याने वडिलोपार्जित शेतीही विकली. मात्र पॅरामेडिकलचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पत्नीला नोकरी लागली, सरकारी नोकरी मिळताच आता पत्नीने पाठ फिरवली आहे. नोकरी मिळाल्यानंतर पत्नीने प्रियकरासह पतीविरुद्ध घटस्फोट आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

व्यवस्थापकाच्या पुतण्यासोबत पत्नीचे प्रेमसंबंध

पत्नी श्रावस्ती जिल्ह्यातील संयुक्त रुग्णालयात कर्मचारी म्हणून तैनात होती. नोकरी मिळाल्यानंतर अर्चनाची वागणूक बदलली, असा आरोप पतीने केला आहे. मीटिंगला जाताना अर्चना अमित कुमारपासून अंतर ठेवू लागली. त्यानंतर राज पॅरामेडिकल नर्सिंग कॉलेजच्या व्यवस्थापकाच्या पुतण्यासोबत पत्नीचे प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती त्याला मिळाली. अमितचा आरोप आहे की व्यवस्थापकाच्या पुतण्याने त्याच्या पत्नीला अभ्यासादरम्यान प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. जेव्हा तो पत्नीला भेटायला कॉलेजला जायचा तेव्हा धनंजय मिश्रा तिला त्याच्या खोलीत भेटायचा. याबाबत पत्नीशी बोललो असता, तो तिचा मित्र असल्याचे ती सांगायची अशी माहिती अमितकुमार यांनी दिली आहे.

हेही वाचा – VIDEO: “हा पाकिस्तान नाही भारत आहे” सीमा हैदरचा बंद खोलीतील व्हिडीओ व्हायरल; नेटकरी संतापले

दरम्यान अमितकुमारने याबाबत बस्ती पोलिसांत पत्नीविरोधात तक्रार दाखल केली असून बस्ती पोलिसांनी अमित कुमार यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.