Kabaddi Boys Fight Video: कबड्डी खेळामुळे शारीरिक आणि मानसिक विकासास मदत होते. त्याचमुळे भारतात इतक्या वर्षांनंतरही या देशी खेळाची जबरदस्त फॅन फॉलोईंग पाहायला मिळते. अगदी लहान मुले असो वा प्रौढ, प्रत्येकाला हा खेळ आवडतो. अगदी खेड्यापाड्यांपासून शहरात राहणाऱ्या लोकांचाही हा आवडीचा खेळ आहे. हा सांघिक खेळ असल्याने अनेक तरुण एकत्र येऊन हा खेळ खेळतात. पण अनेकदा या खेळादरम्यान हाणामारीच्या घटनाही घडतात. अशाच एका हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये कबड्डीचे मैदान काही क्षणांत कुस्तीचा आखाड्यात बदलल्याचे दृश्य पाहायला मिळते.

कबड्डीचं मैदान बनलं कुस्तीचा आखाडा

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, एखाद्या खेळादरम्यान पराभूत संघाचे अनेकदा विजेत्या संघांबरोबर वाद होतात. काही वेळा दोन्ही संघांतील लोक समजून घेत भांडण सोडवतात. पण, काही वेळा हे भांडण इतके टोकाला जाते की, दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना बेदम मारहाण करायला सुरुवात करतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओतही असेच दृश्य पाहायला मिळाले. कबड्डी खेळणाऱ्या दोन संघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला आणि तो वाद अखेर इतका विकोपाला गेला की, दोन्ही संघांतील खेळाडू मारहाण करण्यासाठी एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

एकाच तरुणाला टार्गेट करून मारहाण

व्हिडीओमध्ये दोन संघांतील खेळाडू मारामारी करताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यात काही वेळाने खेळाडू एकाच तरुणाला टार्गेट करून मारहाण करताना दिसत आहेत. बॅग घेतलेल्या त्या तरुणाला सर्व मिळून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत आहेत.

हेही वाचा – “तुम्ही भारतात निघून जा, काळे…”, कॅनडात भारतीयाबरोबर गैरवर्तन; धक्कादायक VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स करून आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, या खेळामध्येच काहीतरी घडले असेल. तर दुसऱ्याने लिहिले की, तुमच्यापैकी अनेक जण मिळून एका व्यक्तीला मारहाण करीत आहेत हे चुकीचे आहे.

Story img Loader