Kabaddi Player Fight: आयआयटी कानपूर येथे एका कबड्डी सामन्यांत वाद होवून दोन गट आमने सामने आले आणि तुफान हाणामारी झाली. या सामान्यात इतका वाद झाला की, त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. विद्यार्थ्यांनी एकमेकांना खुर्च्याही फेकून मारल्या. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा सुरु आहे. सामना सुरु असतानाच दोन कबड्डी संघातील खेळाडूंमध्ये हिंसक भांडण झाले. पाहता पाहता या कबड्डी सामन्याला गोंधळाचे वळण लागले. विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. दोन कबड्डी संघातील खेळाडूंनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. तसेच एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. किरकोळ वादातून झालेल्या मारामारीचा व्हिडिओ शनिवारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. कबड्डी स्पर्धा खेळाडूंमध्ये दंगल ठरली. मारामारीमुळे विद्यार्थिनींनी घटनास्थळावरून पळून आपला जीव वाचवला.

(हे ही वाचा : तुम्ही किती वर्षाचे आहात? ‘या’ तक्त्यात तुमचं लपलेलं सध्याचं वय दिसणार )

शनिवारी दोन कबड्डी संघ एकमेकांशी भिडले. या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. आयआयटी प्रशासनाकडून अद्याप उत्तर आलेले नाही. या वार्षिक स्पर्धेत देशभरातील सुमारे ४५० महाविद्यालयातील सुमारे २,५०० खेळाडू सहभागी होत आहेत. शनिवारी नेताजी सुभाष युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली आणि वायएमसीए फरीदाबाद यांच्यात कबड्डीचा सामना सुरू होता. यावेळी प्रशिक्षक आणि प्रेक्षकही उपस्थित होते. दोन्ही संघांच्या खेळाडूंमुळे कबड्डी सामन्याचे रुपांतर गदारोळात झाले.

येथे पाहा व्हिडीओ

कबड्डीपटूंनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या

सामन्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये काही मुद्द्यावरून वादावादी झाली. वादावादीनंतर सुरू झालेल्या वादाने हाणामारीचे रूप धारण केले. दोन्ही कबड्डी संघाचे खेळाडू एकमेकांना भिडले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भांडणानंतर खुर्च्या उसळताना दिसत आहेत. घटनास्थळी उपस्थित महिला खेळाडू जीव वाचवण्यासाठी लपताना दिसल्या. वापरकर्ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. या घटनेबाबत आयआयटी प्रशासनाकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi player fight violent brawl erupted between two kabaddi teams at iit kanpur viral video social media pdb