आपल्यापैकी अनेकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी जाण्यासाठी बसस्थानकावरील गर्दी किंवा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्मवर असणारी गर्दी पाहिली असेल. अनेकदा अशावेळी एसटीमध्ये चढायला मिळत नाही म्हणून लोक वाटेल त्या पद्धतीने आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र असं काही विमानामध्ये शिरण्यासाठी घडल्याचं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटले. मात्र खरोखरच एखाद्या बसस्थानक अथवा रेल्वे स्थानकातील दृष्य वाटावीत अशी दृष्य आज काबूलमधील विमानतळावर दिसत असून विमानामध्ये चढण्यासाठी असणाऱ्या शिडीवरुन लोक जमेल तसं चढून विमानात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायत. काबूलमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर हजारो नागरिकांनी भीतीने पलायन करण्यासाठी सध्या उपलब्ध असणारा एकमेव हवाई मार्गच आपल्याला देशातून बाहेर काढून शकतो या आशेने विमानतळावर धाव घेतलीय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा