Panipuri Video : ‘पाणीपुरी’ हा शब्द जरी उच्चारला तरी काही लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी खायला आवडते. एक फेमस स्ट्रीट फूड म्हणून पाणीपुरीची ओळख आहे. हल्ली पाणीपुरीचे अनेक नवनवीन प्रकार दिसून येतात.
मटर पाणीपुरी, चणा पाणीपुरी, बटाटा पाणीपुरी, चिकन-मटन पाणीपुरी, केळी पाणीपुरी, असे पाणीपुरीचे अनेक प्रकार तुमच्या वाचनात आले असतील; पण तुम्ही कधी कढी पाणीपुरी खाल्ली आहे का? हो, दही किंवा ताकापासून बनलेली कढी पाणीपुरी. सध्या सोशल मीडियावर असाच एका कढी पाणीपुरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Tamhini Ghat Pune Video : रविवारी ताम्हिणी घाटात जाण्याचा विचार करत आहात? एकदा गर्दी पाहा, नाहीतर…पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, एका पाणीपुरी विक्रेत्याने सुरुवातीला हातात पुरी घेतली आहे आणि तो त्यात उकडलेले चणे, बुंदी टाकून ही पाणीपुरी चिंचेच्या पाण्यात नाही तर कढीत बुडवून सर्व्ह करताना दिसत आहे. या व्हिडीओवर ‘कढीवाली पाणीपुरी, अहमदाबाद’ अशी कॅप्शन लिहिलेली आहे.
पाणीपुरीचा हा नवा प्रकार पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अहमदाबाद येथील असलेली ही खास कढी पाणीपुरी तुम्हीसुद्धा घरी बनवून खाऊ शकता.

हेही वाचा : हेही वाचा : ऐकावं ते नवलंच! एकाच झाडावर येतात तब्बल चाळीस प्रकारची फळे, निसर्गाचा नियम मोडणाऱ्या ‘या’ झाडाविषयी जाणून घ्या

foodiepopcorn या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “कढी पुरी; तुम्ही कधी खाणार का?”
या व्हिडीओवर अनेक लोकांनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी अशी कढी पाणीपुरी कधीच खाणार नसल्याचे सांगितले. एका युजरने लिहिलेय, “ही पाणीपुरी दिसायला वाईट नाही.” तर एका युजरने लिहिले आहे, “आता फक्त दूध पाणीपुरी खायची बाकी आहे.” आणखी काही युजर्सनी या नव्या पाणीपुरीचे कौतुकसुद्धा केले आहे.

Story img Loader