Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. तुम्ही काका-काकुंना देखील भन्नाट गाण्यांवर भन्नाट डान्स करताना पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काकांनी मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू फुलेल एवढं नक्की.
“आयुष्य खूप छान आहे ते फक्त जगता आलं पाहिजे”
या काकांनी “बाई गं पिचली माझी बांगडी बांगडी” या मराठमोळ्या गाण्यावर भन्नाट असा डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थिरकायला लागाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे काका मनसोक्त असा डान्स करत आहेत. आजूबाजूला कोण आपल्याला बघतंय, कोण काय म्हणेल याची काळजी न करता या काकांनी डान्सचा मनसोक्त आनंद लुटला आहे. तसेच या काकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तर तुम्हीही पोट धरुन हसाल. शेवट देखील भन्नाट आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा. हा व्हिडिओ तुम्हाला देखील नक्की आवडेल. आयुष्य कसं जागायचं हे हा व्हिडीओ पाहून कळतं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इस्टाग्रामवर tractor_modification_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये, “आयुष्य खूप छान आहे ते फक्त जगता आलं पाहिजे” असं लिहलं आहे. तसेच यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘वाह काकांचा नाद नाय’ तर आणखी एकाने म्हटले आहे की, “असं आयुष्य असं जगता आलं पाहिजे”. तसेच दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, यांचा डान्स पाहून मलाही डान्स करायची इच्छा झाली. हा व्हिडीओ अनेकांनी रिपोस्ट देखील केला आहे.