Kala Chashma Viral Video: कतरिनाच्या काला चष्मा या गाण्यावर नॉर्वेच्या ‘Quick Style’ या डान्स ग्रुपचा व्हिडीओ सुद्धा प्रचंड गाजला होता. जून महिन्यात एका मित्राच्या लग्नादरम्यान या ग्रुपने बॉलिवूड बिट्स वर कमाल स्टेप्स करत सर्वांना त्यांच्या प्रेमात पाडले होते. आमच्या मित्राच्या लग्नात कतरीना येऊ न शकल्याने त्याच्यासाठी आम्हीच कतरीना बनलो असे म्हणत यासिन नावाच्या ग्रुप मेंबरने हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज व लाखो लाईक्स आहेत. हा एक व्हिडीओ आणि त्यातील स्टेप्स नेटकऱ्यांना इतक्या आवडल्या की आता प्रत्येक पार्टी ही रील बनवल्याशिवाय पूर्णच होत नाही असे दिसत आहे. अलीकडेच या गाण्यावर एका लेडीज गॅंगचा व्हिडीओ सुद्धा तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिझा गौतम यांनी हा आपल्या मैत्रिणींसोबत काला चष्मा गाण्यावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता. अनेक पेजेसवर हा व्हिडीओ पाहायला मिळत आहे ज्याला हजारो लाईक्स व लाखो व्ह्यूज आहेत.

Video: आलियाच्या गाण्याला जर्मन तडका, पटाखा गुड्डी गाण्यावर तरुणींची धम्माल

काला चष्मा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाने झिम्बावे विरूद्ध ३-० अशी मालिका जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये टीम इंडियाने सुद्धा या गाण्यावर जल्लोष साजरा केला होता. उप कर्णधार शिखर धवनने पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये टीम ‘काला चष्मा’ गाण्यावर थिरकताना दिसली आहे.

शिखर धवन व्हायरल व्हिडीओ

पंजाबच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने लिहिलेल्या या गाण्याला कोट्यावधी व्ह्यूज आहेत.कतरिना कैफ व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या बार बार देखो सिनेमातील हे सॉंग सिनेमापेक्षा सुद्धा अधिखं हिट झालं होतं.