Viral Video: यार कॉलेजच्या शेवटच्या दिवशी ना फुल्ल धुमाकूळ घालू, वर्षभर त्रास देणाऱ्या त्या एका शिक्षकाचा काहीतरी प्रँक करून धडा शिकवू असे एक ना अनेक भन्नाट प्लॅन्स विद्यार्थ्यांना करताना आपणही पाहिले असेल किंवा आपल्यापैकी काहींनी स्वतः असं केलंही असेल. अशाच एका हटके टाळक्याने आपल्या पदवीप्रदान सोहळ्यात असं काही केलं की तो रातोरात व्हायरल झाला आहे. यापूर्वी तुम्ही पंजाबच्या विद्यापीठातील एका तरुणाला पदवी प्रदान सोहळ्यात बेभान भांगडा करताना पाहिलं असेल त्याचप्रमाणे आता मुंबईतील विद्यार्थ्याचा डान्स सुद्धा व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण व्हायरल व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी एकदम कूल अंदाजात स्टेजवर काला चष्मा गाण्यावर ट्वर्क (Twerk) करताना दिसतोय. नॉर्वेच्या एका डान्सर ग्रुपने आपल्या मित्राच्या लग्नात काला चष्मावर डान्स केल्यानंतर आता अनेकांनी या काला चष्मा गाण्याचे हटके व्हर्जन शूट करून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Gautami Patil Dance Video: लावणीच्या नावावर अश्लील चाळे; गौतमी पाटीलला पाहून भडकले नेटकरी अन मग..

तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की हा विद्यार्थी स्टेजवर चढतो आणि अचानक खाली पडतो, सुरुवातीला तो खरंच पडला असं वाटून पूर्ण शांतता पसरते आणि इतक्यात गाणं वाजू लागतं आणि तो भन्नाट स्टेप्स करत स्टेजवरच नाचु लागतो. त्याची एनर्जी पाहून इतरही सर्व बेभान होऊन नाचताना दिसतात.या विद्यार्थ्याचे नाव माहीर मल्होत्रा असे असून त्याने स्वःत हा व्हिडीओ शेअर केला आहे. माहीरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “तुम्ही हे असं करून बघू नका मी याला प्रोत्साहन देत नाही”, असं सांगून आधीच आपली बाजू स्पष्ट केली आहे.

पाहा काला चष्मा वर Twerking

सोशल मीडियावर अनेकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. अनेकांनी त्याच्या हिंमतीला दाद देत मानलं तुला अशा शब्दात कमेंट केल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटतो नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kala chashma viral video student twerks in convocation ceremony teachers shocked svs