Kalachauki mahaganpati Viral video: गणपती बाप्पा मोरया…, मंगलमूर्ती मोरया…चा गजर, फटाक्यांची आतषबाजी, दारात सुरेख रांगोळी, सजलेली आरास, विद्युत रोषणाईचा झगमगाट असं वातावरण काहीच दिवसांत आता सर्वत्र पाहायला मिळणार आहे. राज्यभरात गणपतीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काहीच दिवसांत आपल्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे. सार्वजनिक मंडळं मंडप वगैरे बांधून मूर्तीभोवती केल्या जाणाऱ्या सजावटीला लागले आहेत. खरं तर गणपती बाप्पाच्या आगमनाला अजून १४ दिवस बाकी आहेत. पण, मुंबईत काही ठिकाणी आताच गणेशमूर्तींचे आगमन सुरू झालंय. याच पार्श्वभूमीवर काळाचौकीमधील महागणपतीच्या आगमन मिरवणुकीतला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, या व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमकं झालं काय? तर झालं असं की, या मिरवणुकीत एक गाणं वाजवलं गेलं, जे ऐकून सगळेच संतापले आहेत.

गणरायाच्या उत्सवात त्याची आराधना करताना हिंदी चित्रपट गाणी किंवा मराठीतील नको ती गाणी वाजवण्याचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. या गाण्यांऐवजी भाव-भक्तिसंगीतातील गाण्यांवर भर देण्याचे आवाहन केले आहे. अनेकवेळा असं पाहायला मिळतं की, अश्लील आणि धांगडधिंगा असलेली गाणी वाजवली जातात. काळाचौकीच्या महागणपतीच्या आगमनातही असंच एक गाणं वाजवलं आणि त्यावरून नाराजगी व्यक्त केली गेली.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”

हे गाणं होतं “ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय…” या गाण्यावर तरुणाईही थिरकताना दिसली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटकरीही चांगलेच भडकले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्हीच सांगा साहेब बापाला सांगू कसं? MPSC आंदोलनात विद्यार्थीनीचं सरकारकडे साकडं; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

सोशल मीडियावर हा व्हिडीओ tanveeeeeeeee नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओवर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलं आहे, का हे गाणं वाजवावं वाटलं असेल? गाण्याचा आणि बाप्पाचा काय संबंध?” तर आणखी एका युजरने “सुरेखा पटलेली हाय वरती नाचणाऱ्या सगळ्यांनी बदलापूर, कोलकाता केसमुळे यावर्षी तरी एकही मिरवणूक काढायला नको होती”, असे म्हंटले आहे.

बाप्पाच्या आगमनाला जाण्याआधी हे वाचा

काळाचौकीमधील महागणपतीचे ११ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात भक्तांनी स्वागत केलं. हजारोंच्या संख्येने भक्त, तरुण मंडळी यावेळी एकत्र आली होती. मात्र, या गर्दीच्या उत्साहामागचं भीषण वास्तव तुम्ही पाहिलं तर पुन्हा कोणत्या आगमनाला जाण्याआधी शंभर वेळा विचार कराल एवढं नक्की. ज्या ठिकाणाहून गणपतीची मूर्ती आणली जातेय, त्या मार्गावर प्रचंड गर्दी आहे. लोकांना साधं उभं राहायलाही जागा नाहीये. अशातच चेंगरा-चेंगरीची शक्यता असताना तिथे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे. काही तरुणी गर्दीमध्ये चेंगरल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. अशात गर्दीमुळे काहीच करता येत नव्हतं, तरी काही जणांनी तरुणींना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.