Kalachauki mahaganpati Viral video: गणपती बाप्पा मोरया…, मंगलमूर्ती मोरया…चा गजर, फटाक्यांची आतषबाजी, दारात सुरेख रांगोळी, सजलेली आरास, विद्युत रोषणाईचा झगमगाट असं वातावरण काहीच दिवसांत आता सर्वत्र पाहायला मिळणार आहे. राज्यभरात गणपतीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काहीच दिवसांत आपल्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे. सार्वजनिक मंडळं मंडप वगैरे बांधून मूर्तीभोवती केल्या जाणाऱ्या सजावटीला लागले आहेत. खरं तर गणपती बाप्पाच्या आगमनाला अजून १४ दिवस बाकी आहेत. पण, मुंबईत काही ठिकाणी आताच गणेशमूर्तींचे आगमन सुरू झालंय. याच पार्श्वभूमीवर काळाचौकीमधील महागणपतीच्या आगमन मिरवणुकीतला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, या व्हिडीओवर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमकं झालं काय? तर झालं असं की, या मिरवणुकीत एक गाणं वाजवलं गेलं, जे ऐकून सगळेच संतापले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा