Viral Video : सोशल मीडियावर गडकिल्ल्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. महाराष्ट्रीयन लोक आवर्जून गड किल्ल्यांना भेट देतात तेथील इतिहास जाणून घेतात. महाराष्ट्राला लाभलेले सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई शिखर. अनेक लोकं या उंच शिखरावर जातात आणि तेथील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये एक तरुण साखळी ओढताना दिसत आहे. तुम्हाला या साखळीविषयी माहितीये का? आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही लोकं कळसूबाई शिखरावर उभे आहेत. तिथे भगवा सुद्धा फडकवलेला दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण साखळी ओढताना दिसत आहे. ही साखळी खूप मोठी असल्याची दिसत आहे. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “कळसूबाईवरील या लोखंडी साखळीबद्दल कोणाला माहिती आहे का?”

कळसूबाई शिखरावरील लोखंडी साखळी

जेव्हा तुम्ही कळसूबाई शिखरावर जाल तेव्हा तुम्हाला तिथे एक लोखंडी साखळी दिसेल. या लोखंडी साखळीविषयी तुम्हाला माहिती आहे का? या लोखंडी साखळीविषयी एक आख्यायिका आहे. असं म्हणतात की मनात एक इच्छा धरुन ती साखळी जर आपण एका दमात ओढली तर मनातली इच्छा पूर्ण होते, असा समज आहे. अनेक ट्रेकर्स ही हौस पूर्ण करताना दिसतात.
पूर्वी यायला आणि जायला शिडी नव्हकी तेव्हा याचा वापर केला जायचा. साखळीचा उपयोग करुन येण्यासाठी जाण्यासाठी व्हायचा पण आता लोकं या साखळीचा उपयोग इच्छा पूर्ण करण्यासाठी करतात.

हेही वाचा : राम मंदिराबाहेर घुमला शिवरायांचा जयघोष! पुण्यातील श्रीराम पथकाने ढोल वादन करत श्रीरामांना दिली अनोखी मानवंदना

Sachin Pawar Patil या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काही महिती असेल तर ज्ञानात भर टाका” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जुन्या काळात शिडी नव्हती तर जाण्यासाठी त्याच साखळीचा उपयोग करुन वर जात होते लोक” तर एका युजरने लिहिलेय, “नवसाची साखळी आहे. त्या भागातील लोकांनी सांगितलय. नवस पूर्ण झाल्यावर एका दमात ती ओढायची असते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “या साखळीविषयी अनेक अफवा आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalsubai shikhar iron chain after pulling iron chain in kalsubai shikhar do really fullfill our desires or will ndj
Show comments