Kamada Ekadashi Vrat Katha: हिंदू धर्मात एकादशी व्रताचे खूप महत्व सांगण्यात आले आहे. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकदशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते, तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशाप्रकारे वर्षामध्ये एकूण २४ एकादशी येतात. दरम्यान, आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आहे, या एकादशीला कामदा एकादशी म्हटले जाते.
पंचांगानुसार, आज ८ एप्रिल २०२५ रोजी कामदा एकादशी साजरी केली जाईल. एकादशीचे व्रत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी केले जाते.
कामदा एकादशी व्रत कथा
विष्णू पुराणानुसार, भोगीपूर नावाचे एक शहर होते. पुंडरीक नावाचा राजा तिथे राज्य करत होता. या शहरात अनेक अप्सरा, किन्नर आणि गंधर्वही राहत होते. त्यांच्यातील ललित आणि ललिता या पती-पत्नीच्या जोडप्याचे एकमेकांवर खूप प्रेम होते. एके दिवशी गंधर्व ललित दरबारात गात असताना अचानक त्याला त्याची पत्नी ललिताची आठवण आली. यामुळे त्याचा आवाज, लय आणि ताल सर्व बिघडू लागले. करकट नावाच्या सापाला ही चूक कळली आणि त्याने राजाला हे सांगितले. यावर राजा खूप रागावला आणि त्याने ललितला राक्षस होण्याचा शाप दिला. जेव्हा ही गोष्ट ललिताला समजली तेव्हा तिला खूप त्रास झाला, त्यावेळी ती श्रृंगी ऋषि यांच्या आश्रमामध्ये जाऊन प्रार्थना करू लागली. त्यावेळी त्या ऋषींनी ललिताला चैत्र शुक्ल पक्षातील कामदा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. हे व्रत करताच ललित राक्षस योनीतून मुक्त होऊन त्याच्या मूळ रूपात आला. तेव्हापासून हे व्रत अनेकजण मनोकामना पूर्ण करण्यासाठी करू लागले. गुगल ट्रेंडवरही कामदा एकादशी व्रत कथा मागील काही तासांपासून ट्रेंड होत आहे.
आज एकादशीच्या दिवशी १२ राशींना त्यांच्या राशींनुसार श्रीविष्णूंच्या कोणत्या मंत्राचा जप करायला हवा, हे जाणून घ्या.
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या व्यक्तींनी श्रीविष्णूंच्या “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.
वृषभ
श्रीविष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी “ॐ विष्णवे नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या व्यक्तींनी श्रीविष्णूंच्या “ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णूः प्रचोदयात् || “ या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या व्यक्तींनी श्रीविष्णूंच्या “ॐ नारायणाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींनी श्रीविष्णूंच्या “ॐ गोविंदाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींनी श्रीविष्णूंच्या “ॐ नारायणाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या व्यक्तींनी श्रीविष्णूंच्या “ॐ हृषीकेशाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी श्रीविष्णूंच्या “ॐ पद्मनाभाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींनी श्रीविष्णूंच्या “ॐ त्रिविक्रमाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या व्यक्तींनी श्रीविष्णूंच्या “ॐ हृषीकेशाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.
कुंभ
धनु राशीच्या व्यक्तींनी श्रीविष्णूंच्या “ॐ त्रिविक्रमाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.
मीन
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या व्यक्तींनी श्रीविष्णूंच्या “ॐ हृषीकेशाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)