सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीने चक्क हेलिकॉप्टरमधून नोटांचा वर्षाव केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने एक दोन लाख नव्हे तर तब्बल १० लाख डॉलर्सच्या नोटांचा हेलिकॉप्टरमधून वर्षाव केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिवाय या नोटा घेण्यासाठी हातात मोठमोठ्या बॅग घेऊन मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तर या व्यक्तीने हेलिकॉप्टरमधून एवढ्या नोटा खाली का फेकल्या आणि तो व्यक्ती नेमका कोण आहे. याबाबतची माहिती माहिती जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या माहितीनुसार, इन्फ्लुएन्सर आणि टीव्ही होस्ट कामिल बार्टोशेक याने एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यासाठी त्याने त्याच्या आगामी चित्रपटातील एक कोडं दिलं होत आणि ते कोडं सोडवणाऱ्या व्यक्तीला तो तब्बल एक दशलक्ष डॉलर्स देणार होता. मात्र, त्याने दिलेलं कोडं कोणालाही सो़डवता आलं नाही. त्यामुळे त्याने दुसरा प्लॅन केला.

हेही पाहा- महिलेच्या निष्काळजीपणामुळे घडला भीषण अपघात, भररस्त्यात कारचा दरवाचा उघडायला गेली अन्…, थरारक VIDEO व्हायरल

लोकांना ईमेलद्वारे एका ठिकाणी बोलावलं –

कामिल बार्टोशेक याने स्पर्धेत सहभागी झालेल्या लोकांना ईमेल पाठवला आणि एनक्रिप्टेड माहिती देऊन लोकांना एका ठिकाणी बोलावलं. यानंतर कामिल याने १० लाख डॉलर्सच्या नोटा एका कंटेनरमध्ये भरल्या आणि तो कंटेनर हेलिकॉप्टरच्या साह्याने उचललून उंच आकाशात गेला. उंचावर पोहचताच त्याने कंटेनरमधून खाली जमलेल्या लोकांवर नोटांचा वर्षाव केला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये खाली जमिनीवर उभे असलेले लोक नोटा जमा करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. तर यातील काही लोक हातात मोठमोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन आले होते, जे पिशवीत नोटा भरताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये आकाशातून पैशांचा पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. तर या नोटा गोळा करण्यासाठी जवळपास चार हजार लोक जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

कामिल बार्टोशेक याने सांगितले की, प्रत्येक नोटेवर एक क्यूआर कोड देण्यात आला आहे, या कोडच्या मदतीने पैसे गोळा करण्यासाठी येणारे लोक ते गरजू लोकांना दान करू शकतात. तसेच १ दशलक्ष डॉलर्स लोकांमध्ये वाटण्यात आले, यावेळी पैसे गोळा करण्यासाठी जमलेल्या लोकांना गर्दीमुळे कसलाही त्रास झाला नाही. त्यामुळे हा खरा धनवर्षाव झाल्याचं लोकं म्हणत आहेत.