Kangana Ranaut Viral Video: लाइटहाऊस जर्नालिज्मला कंगना रणौत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे लक्षात आले. अलीकडे, ६ जून रोजी, सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने चंदिगढ विमानतळावर अभिनेत्री बनलेल्या भाजपा खासदार कंगना रणौत यांनाकानाखाली मारली होती, त्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मीडियाच्या उपस्थितीत कंगना रणौत यांना सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन बाहेर नेताना दिसत आहे इतक्यात एक पत्रकार तिला अनुचित प्रश्न विचारतो असा दावा या व्हिडीओमध्ये केला जात आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Anand Yadav (Advocate) ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील व्हायरल व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि त्यातून अनेक कीफ्रेम मिळवून तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च सुरू केला. रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला ‘बॉलीवूडशादी’ या इंस्टाग्राम हॅण्डलवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.
व्हिडीओतील एकाही पत्रकाराने कोणत्या गालावर मारलं हे विचारले नाही.
आम्हाला व्हिडिओमध्ये पीटीआयचा माईक देखील दिसला, म्हणून आम्ही PTI चे सोशल मीडिया हॅण्डल शोधले. त्यानंतर आम्हाला वेगळ्या अँगलमधू घेतलेला व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ दिल्ली विमानतळावर काढण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्येही एकाही पत्रकाराने अनुचित प्रश्न विचारल्याचा व्हायरल ऑडिओ आम्हाला ऐकू आला नाही.
आम्हाला ANI च्या X हॅण्डलवर अपलोड केलेला व्हिडीओ देखील सापडला.
तिथेही आम्हाला कोणत्याही पत्रकाराने कोणताही अनुचित प्रश्न विचारल्याचा ऑडिओ सापडला नाही. पत्रकारांनी एकच प्रश्न विचारला, ‘काय झालं?’
हे ही वाचा<< कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांच्या लीक क्लिपमुळे खळबळ, मोदींवरही होतेय टीका! Video मध्ये काय व कधी घडलं?
निष्कर्ष: व्हायरल व्हिडीओ ज्यामध्ये एक पत्रकार भाजपा खासदार कंगना रणौत यांना “तुमच्या कोणत्या गालावर मारलं” असे विचारताना ऐकू येत आहे हा व्हिडीओ खोटा व एडिटेड आहे.