बॉलीवूड अभिनेत्री आणि आता भाजपा खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला जवानाने मारहाण केल्याचे समोर आलं आहे. कंगना रणौत यांना कानशिलात लगावल्याची घटना घडली, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. अभिनेत्री आणि मंडी लोकसभेची खासदार कंगना रणौत हिला कानशिलात लगावणे CISF महिला जवानाला चांगलेच महागात पडले आहे. या घटनेनंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे, ज्यामुळे सध्या वातावरण तापलं आहे. आता कंगना हिने स्वतःसोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल संताप व्यक्त केला आहे. पण, या पलीकडे आता दुसरीच घटना समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता या संपूर्ण घटनेत फक्त कंगना रणौतबद्दल बोलले जात आहे, पण याचदरम्यान आणखी एक घटना घडली, जी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कंगनासोबत उभ्या असलेल्या एका व्यक्तीने तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेला मागून जोरदार झापड मारली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगनासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीने मारली झापड

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कंगना रणौतसोबत अनेक लोक उपस्थित आहेत. हा व्हिडिओ कानशिलात मारण्याच्या घटनेनंतरचा आहे. कंगनाच्या जवळ उभी असलेली काळ्या कपड्यातली मुलगी समोर येताच मागे उभा असलेला हिमाचली टोपी घातलेली एक व्यक्ती तिला मागून झापड मारतो. या काळात त्याला कोणीही अडवत नाही. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून कंगना रणौतचा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.

(हे ही वाचा : आनंदावर विरजण! वाफेच्या इंजिनवर धावणाऱ्या ट्रेनला पाहायला गेली अन् एक सेकंदाची ‘ही’ चूक पडली भारी; हृदय हेलावणारी घटना समोर )

लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि म्हणत आहेत की, “कंगनाच्या प्रकरणाची चर्चा होत असताना त्यावर चर्चा का होत नाही. एक पुरुष उघडपणे एका महिलेवर हात उचलत आहे आणि त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. तिथे उभे असलेले सुरक्षा कर्मचारीही गप्प आहेत.” सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. कंगनासोबत दिसणाऱ्या या व्यक्तीच्या अटकेबाबतही अनेक लोक बोलत आहेत. या व्हिडीओवर लोक सतत मोठ्या प्रमाणात कमेंट करतानादेखील दिसत आहेत.

येथे पाहा व्हिडिओ

दरम्यान, भाजपाने कंगना रणौतला हिमाचल प्रदेशातील मंडीमधून लोकसभेचे तिकीट दिले. लोकसभा निवडणुकीत कंगनाने मोठा विजय मिळवला आहे, त्यामुळे बॉलीवूड गाजवल्यानंतर आता दिल्ली गाजवायला कंगना सज्ज झाली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut slapgate after the slap incident a man was seen slapping another woman in front of kangana ranaut pdb
Show comments