जगाच्या काही भागातच आढळणाऱ्या कांगारूंचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमध्ये अनेकजण एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना आणि तर कधी खेळताना बागडताना दिसत असतात. आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कधी कधी शांत स्वभावाचे प्राणी सुद्धा कधी कधी भडकतात आणि ते एकदा भडकले की मग समोर कुणीही असो त्याला धडा शिकवल्याशिवाय ते शांत होत नाहीत. असाच हा कांगारूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये कांगारूने एका व्यक्तीवर हल्ला केलाय. यात त्याने व्यक्तीला जमिनीवर किती तरी वेळा आपटलं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सुरूवातीला एका झाडामागून एक व्यक्ती धावत येताना दिसून येतोय. त्याच्यामागून एक कांगारू सुद्धा त्याचा पाठलाग करताना दिसून येतोय. पळता पळता त्या व्यक्तीला ठेच लागते आणि खाली पडतो. मागून आलेला कांगारू त्याच्या पुढे येतो आणि पुन्हा त्या व्यक्तीसोबत फाईट करू लागतो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही घटना ऑस्ट्रेलियातल्या साउथ व्हेल वेल्स शहरात घडली असल्याचं सांगण्यात येतंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
Thane dog, floor thrown dog feet, damage bike,
ठाणे : दुचाकीचे नुकसान झाल्याने श्वानाच्या पायावर फरशी टाकली
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

आणखी वाचा : हम साथ साथ है! माकडांचा हा VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांना आठवला महामारीचा काळ

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : शंभरी पार केलेल्या आजीबाईंनी पॅराजम्पिंग करत रचला वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा हा VIRAL VIDEO

या व्हिडीओमध्ये ज्या प्रकारचे दृश्य लोकांना पाहायला मिळत आहे, ते दृश्य आतापर्यंत कुठेच पाहिले नसेल. व्हिडीओच्या शेवटी जखमी व्यक्ती कांगारूच्या वर बसलेला दिसत आहे आणि आपल्या हातांनी कांगारूची मान पकडल्याचे देखील दिसत आहे. हा व्हिडीओ This is Australia नावाच्या युट्यूब चॅनवरून अपलोड करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मनात धडकीच भरते. आतापर्यंत क्यूट कांगारूचे वेगवेगळे व्हिडीओ पाहिले होते, पण कांगारूच्या हल्ल्याचा इतका भयानक व्हिडीओ पहिल्यांदाच पाहिला असल्याची प्रतिक्रिया काही युजर्स शेअर करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ५३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader