तुम्ही जर इंटरनेटवर काही व्हिडीओ पाहण्यात थोडा वेळ घालवला तर तणावपूर्ण दिवस सहज निघून जाऊ शकतो. सोशल मीडियावर अशा मजेदार व्हिडीओंचा जणू खजिनाच असतो. तुम्ही व्हिडीओ स्क्रोल करत असताना, तुम्हाला सर्व प्रकारचे मजेदार, भन्नाट किंवा धक्कादायक व्हिडीओ तुमच्या नजरेस पडतच असतील. असाच एक कांगारूचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की त्यावर आता नेटिझन्सनी भन्नाट कमेंट्सचा महापूर आणलाय. हा व्हिडीओ पाहण्यासाठी जितका मजेदार आहे त्याहूनही जास्त या व्हिडीओवरील कमेंट्स मजेदार आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कांगारू थेट बारमध्ये पोहोचल्याचं दिसून येतंय. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातल्या जॉन फॉरेस्ट नॅशनल पार्कच्या आत असलेल्या एका पबमधला असल्याचं सांगण्यात येतंय. हे पब तुमच्या आमच्या सारख्या माणसांसाठी नव्हे तर इथे फिरणाऱ्या कांगारूंसाठी आहे. या पबमध्ये इथले कांगारू सहजपणे बारमध्ये प्रवेश करू शकतात आणि बारभोवती फिरू शकतात. हे नॅशनल पार्क स्थानिक कांगारूंना नियमित भेटीसाठी प्रसिद्ध आहे.

या व्हिडीओमध्ये एक कांगारू ऑस्ट्रेलियातील एका बारमध्ये शिरताना दिसत आहे. सोशल मीडिया युजर्सना आश्चर्याचा धक्का बसला. जे ग्राहक तेथे मद्यपान करण्यासाठी उपस्थित होते, तिथे कांगारू पाहून त्यांना सुद्धा याचं काहीच आश्चर्य वाटलं नाही आणि त्यांनी शांत प्रतिक्रिया दिली. लोक इतके शांत होते की सोशल मीडिया युजर्सना कांगारू पबचा नियमित ग्राहक असल्याचा संशय आला. लोक कांगारूकडे जाताच, तो कोणताही गोंधळ न करता बारच्या पलीकडे गेलेला दिसून येतो.

आणखी वाचा : Kashmir मध्ये भारतीय लष्कराचे अधिकारी नमाज अदा करताना दिसले, या VIRAL PHOTO ने लोकांची मने जिंकली

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : देशात पहिल्यांदाच जेसीबीने चोरी! २७ लाख रुपयांनी भरलेले एटीएम चोरट्यांनी उखडले

हा मोहक व्हिडीओ ऑस्ट्रेलियन अॅनिमल्स नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला होता आणि व्हिडीओ पेनीविटनबेकर नावाच्या युजरला श्रेय देण्यात आलं होतं. व्हिडीओला आतापर्यंत 2 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 85,160 लाईक्स मिळाले आहेत. हा मजेदार व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स खूश झाले. अनेक युजर्सना कांगारू पाहून लोकांची शांत प्रतिक्रिया आवडली, तर दुसर्‍या युजरने सांगितले की, कांगारू वारंवार दिसत आहेत. लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये लव्ह आणि हार्ट इमोजीद्वारेही आपले प्रेम दाखवले.

Story img Loader