Viral Video: मुंबईकरांसाठी चहा हा अगदीच जिव्हाळ्याचा विषय आहे. ऋतू कुठलाही असो टपरीवरचा किंवा एखाद्या आवडत्या हॉटेलमधील घोटभर चहा घेतल्याशिवाय कोणाच्याही दिवसाची सुरुवात होत नाही. त्यामुळेच मुंबईकरांसाठी तर चहा म्हणजे जीव की प्राण आहे असे म्हणायला हरकत नाही. पण, आज एका चहा विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ; ज्याची अनोखी शैली सगळ्यांना भुरळ पाडत आहेत. चला तर जाणून घेऊ या खास विक्रेत्याबद्दल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चहा विक्रेता मध्य प्रदेशातील जबलपूरचा रहिवासी आहे. कन्हैया कुमार असे या विक्रेत्याचे नाव आहे.वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवणं आणि सर्व्ह करणं ही त्यांची खासियत बनली आहे. कन्हैया कुमार अवघ्या १० वर्षांचे तेव्हा ते लस्सी विकायचे. लस्सी विकायचा व्यवसाय ४० वर्ष केला. त्यांनी लस्सी विकताना काही युक्त्या शिकल्या. लस्सीचा ग्लास घेऊन त्यांनी काही स्टंट करून पाहिले. टीव्हीवर बघता बघता ही सर्व कौशल्ये त्यांनी आत्मसात केली; असे त्यांचे म्हणणे आहे. सुरुवातीला व्यापारी प्रत्येक कप अवघ्या १० पैशांना विकायचे. आता इतक्या वर्षांनंतर ते प्रत्येक कप १० रुपयांना विकत आहेत. चला पाहुयात हा व्हायरल व्हिडीओतून त्यांची अनोखी शैली.

हेही वाचा…‘जेव्हा उन्हाळ्यात तुम्ही भारतात असता..’ मुंबईकरांच्या गरमागरम चहाची जपानी मित्रांना भुरळ, पाहा मजेशीर VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओतून तुम्ही पाहिलं असेल की, कन्हैया कुमार हाताने ग्लास ३६० डिग्री फिरवतात आणि सर्वांना प्रभावित करतो. युक्ती अशी आहे की, चहा बनविताना ते ग्लासातून एक थेंबही खाली सांडू देत नाही. त्यामुळे त्यांचे ग्राहक त्याच्या स्टंट्सने प्रभावित होतात आणि दररोज त्याच्या दुकानात चहा घेण्यासाठी रांगा लावतात आणि या वयातही चहा बनवण्याच्या त्याच्या आवडीचे आणि मेहनतीचे कौतुक करावं तेवढं कमी आहे .वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवणे आणि सर्व्ह करणं चहा विक्रेत्याची खासियत आहे.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @foodfactory.jabalpur या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कन्हैया कुमार प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या दुकानात गर्दी वाढली आहे आणि त्यांना व्यवसाय अधिक कार्यक्षमतेने चालवण्यास मदत झाली आहे. त्यांचे वेगेवेगळे स्टंट सोशल मीडियावर नेटकऱ्यांना पसंत पडत आहेत. यामुळे त्यांच्या ग्राहकांचे मनोरंजनही होत आहे. एकूणच नेटकाऱ्यांकडून या चहा विक्रेत्याचे भरभरून कौतुक होताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.