Kanpur Couple Viral Video: जीवघेण्या स्टंटचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात एका कुख्यात गँगस्टरनं गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी १२ गाड्यांचा ताफा घेऊन रस्त्यावर रपेट केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गँगस्टर अजय ठाकूर विरोधात कारवाई करण्यात आली. त्या घटनेच्या चार दिवसांनी कानपूरमध्ये पुन्हा एकदा असाच प्रकार पुन्हा समोर आला आहे. एका प्रेमी युगुलाने दुचाकीवर अश्लील कृत्य करत त्याचे रिल बनवून सोशल मीडियावर शेअर केले. हे रिल व्हायरल झाल्यानंतर कानपूर पोलिसांनी सदर दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होणाऱ्या सदर व्हिडीओमध्ये आरोपी मुलगा मुलीला दुचाकीवर समोर बसवून अश्लील कृत्य करताना दिसतो. विनाहेल्मेट दुचाकी चालवून नियम पायदळी तुडवणे आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना गंगा बॅरेज परिसरात घडली. व्हिडीओ कधी तयार करण्यात आला, याची नेमकी मात्र समोर आलेली नाही.

३२ सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाई स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालत असल्याचे अशा व्हिडीओंमधून दिसत आहे. अशा उपद्रवी तरुणांना नियंत्रणात आणण्याची मागणी लोकांकडून होताना दिसत आहे.

इंडिया टुडेला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये दिसणारा सदर तरुण कानपूरच्या आवास विकास परिसरात राहणारा असून याआधी वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल त्याच्यावर १० वेळा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. याआधी कानपूरमध्ये जून महिन्यातही अशीच एक घटना घडली होती. ज्यामध्ये एक तरुण धावत्या दुचाकीवर उभा राहून टायटॅनिकची पोझ देत होता.

काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओप्रकरणी गँगस्टर अजय ठाकूरला अटक झाली असून त्याच्यावर याआधी बलात्कार, हत्येचा प्रयत्न, दगडफेक अशा अनेक गंभीर गुन्ह्यांसह ३०हून अधिक खटले दाखल आहेत. या आरोपीचे वय ३० वर्षांच्या आसपास आहे. याच्यावर एक लाखाचे बक्षिस देखील जाहीर करण्यात आले होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याला पकडून तुरुंगात टाकण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanpur couple reel of romancing on moving bike video goes viral invites police action kvg