Kanpur Dhaba Shocking Video : अनेकांना घरातील जेवणापेक्षा बाहेर हॉटेल, ढाब्यावरील जेवण आवडतं. परंतु हॉटेल किंवा ढाब्यामध्ये कशा पद्धतीने जेवण तयार केलं जातं याची कोणाला काही कल्पना नसते. ढाब्यावरील चविष्ट लागणारं जेवण प्रत्यक्षात मात्र किती स्वच्छता राखून बनवलं जात हे पाहिल्यानंतर तुम्ही हॉटेल, ढाब्यावरील जेवण जेवताना १०० वेळा विचार कराल. सध्या अशाच एका ढाब्यावरील व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात एक कामगार अतिशय घाणेरड्या पद्धतीने पीट मळताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे, अनेकांनी व्यक्तीवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

बहुतेक ढाब्यांमध्ये ओपन किचनची सुविधा असते. ज्यामुळे ढाब्यावर येणाऱ्या लोकांना तिथे जेवण कशापद्धतीने बनवले जाते, स्वच्छता पाळली जातेय की नाही याची पाहणी करता येते. व्हायरल व्हिडीओतही एक व्यक्ती तेच करतोय, तो एका ढाब्यावर जेवणासाठी गेला होता यावेळी तिथे एक कामगार बाहेर पीठ मळत होता. पण त्याची पीठ मळण्याची अतिशय घाणेरडी पद्धत पाहून व्यक्तीने त्याचा व्हिडीओ शूट केला. व्हिडीओ शूट करत तो सांगतोय की, हा ढाबा कानपूरमधील प्रयागराज रोडवर आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका ढाब्यात अनेक लोक जेवण्यासाठी बसलेत. यावेळी ढाब्याबाहेर एक कामगार मोठ्या भांड्यात दोन हातांनी पीठ मळतोय. पण पीठ मळण्यासाठी तो कुठल्या स्वच्छ भांड्यातील पाणी वापरत नाही, तर चक्क जमिनीवर पडलेलं घाणेरडं पाणी पीठात मिसळताना दिसतोय, अशाप्रकारे त्याने जमिनीवर पडलेलं अतिशय घाणेरडं पाणी त्याने हाताने उचललं आणि त्यानेच पीठ मळू लागला. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की किती घाणेरड्या पद्धतीने या ढाब्यावर जेवण बनत असेल, हे दृश्य पाहून व्हिडीओ शूट करणारा व्यक्ती कामगाराच्या जवळ गेला आणि त्याला विचारले की, “तू घाणेरड्या पाण्यात पीठ का मळत आहेस, हे तू बरोबर करतोयस का?”. या प्रश्नावर तो कामगार “चुकीचे आहे” असे उत्तर देतो. यानंतर पुढचं काही न ऐकता तिथून तो निघून जातो.

ढाब्याबाहेरील हा घाणेरडा व्हि़डीओ @kamal_giri_maharaj नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला. पण या व्हिडीओचे कमेंट सेक्शन बंद करुन ठेवलं आलं आहे. त्यामुळे या व्हिडिओवर लोकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Story img Loader