Petrol pump accident viral video: सोशल मीडियावर रोज मोठ्या प्रमाणात अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही वेळा चालकांच्या चुकीमुळे होतात त कधी रस्त्यावरील खड्ड्यांमउळे. दरम्यान अशाच एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अख्ख्या पेट्रोल पंपाला आग लागली आहे. कानपूरमध्ये पेट्रोल पंपावर झालेल्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला असून, तो वेगाने व्हायरल होत आहे.
‘हिट अँड रन’ प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी सोमवारीपासून निदर्शने सुरू केली. केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरु आहे. ट्रकचालक संपाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावरही होत आहे. अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका, स्कूल बस तसेच सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होत आहे.काही ठिकाणी तर पेट्रोल न मिळण्याच्या शंकेने पेट्रोल भरण्यासाठी पंपावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. याच गर्दीत एका दुचाकीला पेट्रोल पंपाच्या बाजूला आग लागली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. ही धक्कादायक घटना आणि तितकाच भयानक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> आजोबांचं प्रेम! व्हिलचेअरवर बसवून आजीला दाखवला ताजमहाल; नेटकरी म्हणतात “जिवंतपणीच…”
हा व्हिडीओ @divaspandeylive नामक इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी बघितलं आहे.