Kanpur Viral Video :  पावसाचे दिवस सुरू झाले तरी अनेक राज्यांत अद्याप उन्हाचा तडाखा वाढताना दिसतोय. तप्त उन्हामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे उन्हाचा वाढता प्रकोप जीवघेणा ठरू लागला आहे. याचेच अलीकडील उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशात वाढत्या उकाड्यामुळे एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे उष्माघाताने पोलीस हेड कॉन्स्टेबल बेशुद्धावस्थेत पडून होता; मात्र सब-इन्स्पेक्टर त्याला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी व्हिडीओ बनवत राहिला. परिणामत: रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्याने त्या हेड कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कडाक्याच्या उन्हामुळे लोक हैराण झाले असून, सायंकाळपर्यंत घराबाहेर पडणे टाळा, असा सल्ला दिला जात आहे. मात्र, पोलिसांना उन्हातान्हात आपले कर्तव्य बजावण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. काही पोलिसांना कर्तव्य बजावण्यासाठी तासन् तास उन्हात उभे राहावे लागते. कानपूरमध्ये अशाच प्रकारे वाढत्या तापमानात उष्माघातामुळे एक पोलीस हेड कॉन्स्टेबल बेशुद्ध झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी सब-इन्स्पेक्टर त्याचा व्हिडीओ बनवत राहिला. बराच वेळ झाल्यावर त्यांनी त्याला रुग्णालयात नेले; मात्र रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

वर्गात येताच विद्यार्थिनींनी केले असे काही की पाहून लाजली शिक्षिका, हाताने लपवला चेहरा अन्..; मजेशीर VIDEO व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर पोलीस ठाण्यात तैनात हेड कॉन्स्टेबल ब्रिज किशोर सिंह हे झाशी येथील आपल्या घरी जात होते; पण पोलीस ठाण्याबाहेर त्यांना चक्कर आल्याने ते बेशुद्ध पडले. हेड कॉन्स्टेबल बेशुद्धावस्थेत पाहून एक सब-इन्स्पेक्टर त्यांच्याजवळ आला आणि त्यांना प्रथमोपचार देण्याऐवजी व तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी व्हिडीओ बनवू लागला. काही वेळाने त्यांना रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेचा आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोक विचारत आहेत की, हेड कॉन्स्टेबलला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी तो व्हिडीओ का बनवत होता? पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनात मृत्यूचे कारण उष्माघात असल्याचे दिसते. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतरच नेमके खरे कारण समोर येईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanpur viral video head constable dies heat stroke inspector films instead of helping dies sjr
Show comments