राजधानी दिल्ली (Delhi) येथील कंझावाला हिट अँड रन केसमध्ये एका तरूणीचा जीव गेला होता. ते प्रकरण ताजे असतानाच आता दिल्लीतून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये हॉर्न वाजवण्याच्या कारणावरुन दोन गटामध्ये वाद झाला आणि रागवलेल्या कार चालकाने एका व्यक्तीला कारच्या बोनेटवरुन जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत कारच्या बोनेटवरुन फरपटत नेल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीतील राजौरी गार्डन येथे घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हॉर्न वाजवण्यावरून भांडण

मिळालेल्या माहितीनुसार, राजौरी गार्डन परिसरात हॉर्न वाजवण्याच्या कारणावरुन दोन व्यक्तींमध्ये वाद झाला आणि त्या भांडणात एका कारचालकाने रागारागत समोरच्या व्यक्तीला आपल्या कारच्या बोनेटवरुन जवळपास अर्धा किलोमीटीरपर्यंत फरपटत नेलं. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- Video: पठ्ठ्याने केला कहर, बाईकला पेट्रोलची टाकी नाही तर बाटली वापरतो, सायलेन्सरमध्ये दगड; हा जुगाड पाहाच

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कारच्या बोनेटवरुन तरुणाला फरपटत नेल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीसांनी या घटनेचा तपास करायला सुरुवात केली आहे. शिवाय कारच्या क्रमांकावरून आरोपीचा शोध सुरू केला असून आरोपीविरोधात आयपीसी कलम २७९, ३२३, ३४१, ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पीडित व्यक्तीची माहितीही पोलिसांकडून गोळा केली जात आहे.

हेही पाहा- Video: भांडी धुण्यास नकार, शिक्षिकेची विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद

कंझावाला हिट अँड रन प्रकरण –

राजधानी दिल्लीत झालेल्या कंझावाला येथील अपघातात तरूणीचा जीव गेला. तरूणीला धडक देणाऱ्या कारने तिला १२ किमीपर्यंत फरपटत नेलं. यामुळे तरूणीचा अपघातात मृत्यू झाला. तिचे पाय कापले गेले आणि तिच्या अंगावरचे कपडेही फाटून गेले. तिचा मृतदेह पोलिसांना नग्न अवस्थेत मिळाला. या प्रकरणामुळे संपुर्ण देश हादरला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanzhawala case repeated in delhi dispute over honking video of youth being dragged for half a km goes viral jap