पाकिस्तानातील कराची विद्यापीठात झालेल्या बॉम्बस्फोटात (Blast near Karachi University) तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची शहरात असलेल्या या विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इमारतीजवळ हा स्फोट झाला. सिंध पोलीस प्रमुखांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. प्राथमिक तपासात बुरखा घातलेल्या महिलेने ही घटना घडवून आणल्याचेही त्यांनी सांगितले. दुपारी अडीचच्या सुमारास व्हॅनजवळ आत्मघाती स्फोट झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानी टीव्ही चॅनल जिओ न्यूजनुसार, बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन चिनी नागरिकांचाही समावेश आहे. हे शिक्षक व्हॅनमधून कन्फ्युशियस विभागात जात असताना हा स्फोट झाला.
पाकिस्तानातील कराची विद्यापीठावर झालेला हल्ला एका बुरखा घातलेल्या महिलेने घडवून आणला जी चिनी नागरिकांच्या बसची वाट पाहत होती आणि ती जवळ येताच तिने स्वत:ला उडवले. स्फोट होताच व्हॅनला आग लागली आणि त्यात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. दरम्यान, कराचीतील बॉम्बस्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही (Karachi University Blast CCTV video)समोर आले आहे. या ३० वर्षीय शारी बलोच नावाच्या महिलेच्या पतीने आपल्या पत्नीच्या ‘निःस्वार्थ कृत्याचा’ अभिमान व्यक्त करणारे ट्विट (Suicide Bomber husband tweet) पोस्ट केले आहे, असा दावा अफगाणिस्तानचे पत्रकार बशीर अहमद गवाख यांनी केला आहे.
(हे ही वाचा: कराची विद्यापीठात बुरखा घातलेल्या महिलेकडून आत्मघातकी हल्ला; तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू)
“शरी जान, तुझ्या निःस्वार्थी कृत्याने मला अवाक केले आहे पण आज मी अभिमानानेही भारावून जात आहे. महरोच आणि मीर हसन हे खूप चांगले व्यक्ती बनतील जे विचार करतील की त्यांची आई किती महान स्त्री होती. तू आमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनून राहशील.” कराची आत्मघाती हल्लेखोराचा पती हबितान बशीर बलोच याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
(हे ही वाचा: सासूने ओवाळून नववधूच्या डोक्यातच घातला नारळ; व्हिडीओ सोशल मीडियावर viral)
वृत्तानुसार, शारी बलोचच्या पश्चात तिचा पती आणि दोन मुले – आठ वर्षांची महरोच आणि चार वर्षांची मीर हसन आहेत. तिचा नवरा दंतवैद्य असल्याचे समजते. तिचे वडील सरकारी नोकरीत होते.