भारतात नवरात्रोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. भारतासह विविध देशांमध्ये नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान पाकिस्तानमधील कराची येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

पाकिस्तानीमधील इन्फ्ल्यूएन्सर धीरज मानधन यांनी ऑनलाइन शेअर केलेला व्हिडिओ कराचीमधील नवरात्रोत्सव साजरा केला जात असल्याचे दिसते आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दुर्गा देवीचे एक सुंदर चित्र चौकात लावलेले दिसत आहे. तसेच गल्लीमध्ये सुंदर दिव्यांची रोषणाई केली आहे. महिला आणि मुले पारंपारिक गरबा आणि दांडिया नृत्याकरताना दिसत आहे. एक देवीचे मंदीर दिसत आहे. व्हिडिओला त्वरीत १,४५,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “कराची, पाकिस्तानमध्ये नवरात्रीचा चौथा दिवस. हेअसे एक क्षेत्र आहे जिथे तुम्हाला मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्च चालत जाता इतक्या कमी अंतरावर दिसेल आणि जिथे लोक शांतता आणि सौहार्द यावर विश्वास ठेवतात. या भागाला अनेक लोक मिनी इंडिया असेही नाव देतात पण मी याला आमचा पाकिस्तान म्हणेन. हा जादुई, मंत्रमुग्ध करणारा आणि नवरात्रीचा उत्साह अनुभवण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. प्रत्येकजण आनंदी होता, प्रत्येकजण हसत हसत नाचत होता आणि उत्सवाचा आनंद लुटत होता.

no india pakistan bilateral talks during sco meet says s Jaishankar
पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा नाही : जयशंकर
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Footage of the couple in their wedding attire captured them slow dancing in the cramped, dusty shelter while their guests watched on
VIDEO : बंकरच्या बाहेर क्षेपणास्त्रांचा अन् आतमध्ये प्रेमाचा वर्षाव; इस्रायलच्या युद्धजन्य परिस्थितीत नवविवाहित जोडप्याचा डान्स व्हायरल!
polio cases rising in afganistan
तालिबानने पोलिओ मोहिमेला स्थगिती दिल्याने अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी परिणाम? नक्की घडतंय तरी काय? भारतावरही परिणाम होणार का?
Hungry Ghost festival
भारतातील पितृपक्षासारखी संस्कृती जगात इतर ठिकाणी कुठे सापडते?
indus water treaty
Indus Water Treaty : भारताची पाकिस्तानला ६४ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ कराराबाबत नोटीस; उत्तरादाखल पाकिस्तान म्हणतो, “भारतही…”
What is Onam Sadhya ?
Onam Sadhya : पोळीच्या समावेशामुळे चर्चेत आलेली ‘ओणम सद्या’ थाळी काय आहे?
Nagpur video | a Foreigner Befriends Elephant
फॉरेनरने केली नागपुरच्या हत्तीबरोबर मैत्री; गणेशोत्सवातील VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा – VIRAL VIDEO : पीएचडीची डिग्री घेऊन रस्त्यावर विकतोय चिकन; कारण ऐकून आनंद महिंद्रांनी केलं कौतुक

अनेक नेटिझन्सनी आंतरसांस्कृतिक समरसतेच्या सुंदर प्रदर्शनाचे कौतुक केले. एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, “त्यांना अशा प्रकारे सण साजरे करताना पाहून खूप बरे वाटते.” दुसरा वापरकर्ता पुढे म्हणाला, “व्वा.. हे पाहिल्यानंतर खूप छान वाटले. वास्तविक आशयाद्वारे सकात्मकता आणि प्रेम पसरवत रहा.” तिसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “पाकिस्तानच्या हिंदू समुदायाला शुभ नवरात्र,” ज्याला धीरजने “नवरात्रीच्या शुभेच्छा” असे उत्तर दिले.

हेही वाचा –वडापाव विक्रेता महिन्याला किती पैसे कमावतो? Vloggerने स्वत: केली विक्री, पाहा Viral Video

टाइम्स स्क्वेअर येथे नवरात्री:

पहिल्यांदाच, दुर्गापूजेचा उत्सव न्यू यॉर्क शहराच्या प्रतिष्ठित टाईम्स स्क्वेअरमध्ये पोहोचला आहे. भारतीयांच्या व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.