करीमुल हक या नावाची प्रत्येक भारतीय व्यक्तीने दखल घेण्यासारखी आहे. तुमच्या आमच्यासाठी ते सामान्य व्यक्ती असतील पण त्यांचे काम मात्र असामान्य आहे. चहाच्या बागेत काम करणारे करीमुल हक गेल्या वीस वर्षांपासून गावात मोटारसायकल रुग्णवाहिका चालवतात. खेड्यांपासून रुग्णालय लांब आहेत अनेक गावांत रुग्णवाहिकाही पोहोचत नाही म्हणूनच करीमुल स्वत: आपल्या मोटारबाईकवरून रुग्णांना रुग्णालयात घेऊन जातात.
करीमुल हक चहाच्या बागेत काम करतात. या कामाचे त्यांना दरमहा ४ हजार मिळतात. यातले काही अर्धे पैसे ते आपल्या मोटारबाईकच्या पेट्रोलसाठी खर्च करतात तर उरलेल्या पैशांतून कर्ज फेडतात. पश्चिम बंगालच्या सुबर्नपुर येथे ते राहतात. १९९८ पासून त्यांने मोटार बाईक रुग्णालयाची सेवा सुरू केली आहे. या गावांत आजही रुग्णवाहिका पोहोचत नाही. म्हणूच गावातील आणि आजूबाजूच्या खेड्यातील रुग्णांना आपल्या बाईकवरून रुग्णालयत पोहोचवण्याचे काम ते करतात. लोकांची सेवा करणे हेच आपले कर्तव्य असल्याचे ते मानतात. खेड्यातील लोकांना त्यांनी आपला मोबाईल नंबर दिला आहे. जो फोन करेल त्यांच्या मदतीला करीमुल घावून जातात. गेल्या वीस वर्षांपासून एकटेच ते रुग्णवाहिकेची सेवा देत आहे. त्यांच्या कामगीरींसाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.