प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं. अगदी काहीही. म्हणूनच तर प्रेमात असलेले जोडपे काही करायला तयार होतात. अगदी त्यांना विरोध करणा-या या समाजाशीही दोन हात तयार करायलाही ते मागेपुढे पाहत नाही. ३३ वर्षीय तिबेटीयन लामा थाये दोरजे यांची प्रेमकाहाणी अशीच आहे. बौद्ध भिक्षू विवाह करत नाही. आजन्म संन्यासाचे व्रत ते पाळतात. पण आपल्या बालपणीच्या मैत्रिणीशी विवाह करण्यासाठी त्यांनी आपले संन्यसाचे व्रत मोडले.

थाये दोरजे हे करमापा लामा आहेत. दलाई लामा नंतर हे दुस-या क्रमांकाचे मोठे पद आहे. थाये जेव्हा १८ महिन्यांचे होते तेव्हापासून त्यांना करमापा लामा नावाने संबोधीत करायला सुरूवात झाली. परंतु आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीशी विवाह करण्यासाठी त्यांनी आपले संन्यसाचे व्रत मोडले आहे. थाये दोरजे यांनी ३६ वर्षीय रिंचेन यैंगजोम या बालमैत्रिणीशी २५ मार्चला विवाह केला. रिंचेन यांचा जन्म भूतानमध्ये झाला तर दिल्लीमध्ये तिने शिक्षण घेतले. थाये दोरजे यांच्या कार्यलयातून याविषयी घोषणा करण्यात आली. ”माझ्या लग्नानंतरही माझ्या अनुयायींवर याचा सकारात्मक प्रभाव पडेल अशी मी आशा करतो” असे त्यांनी म्हटले आहे. लग्नानंतरही ते आपल्या अनुयायांना मार्गदर्शन आणि प्रवचन देतच राहतील असेही त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

Story img Loader