Karnataka Assembly Election 2023: कर्नाटकात काँग्रेसने एकहाती बहुमत मिळवलं आणि भाजपाचा दारूण पराभव केला. यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील ३८ वर्षे जुनी परंपरा कायम राहिली आहे. या निकालाबद्दल देशभरात चर्चा सुरु आहे. अशातच आता काँग्रेसच्या विजयानंतर एका तरुणाचा फोटो आणि त्याने केलेले ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण या फोटोतील तरुणाने दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकात काँग्रेसचाच विजय होणार अशी भविष्यवाणी केली होती, जी आज खरी ठरली असल्याचा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मार्चमध्येच केली होती भविष्यवाणी –

हेही पाहा- कर्नाटकात मतमोजणी सुरू असतानाच भाजपा कार्यालयात घुसला साप, मुख्यमंत्री बोम्मईंसह कार्यकर्त्यांची उडाली धांदल, पाहा VIDEO

दरम्यान, आता अनेक लोक ही भविष्यवाणी करणाऱ्या तरुणावर विश्वास ठेवत असल्याचंही पाहायला मिळत आहे. या घटनेची माहिती स्वतः भविष्यवाणी करणाऱ्या तरुणाने त्याच्या जुन्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत दिली आहे. रुद्र करण प्रताप नावाच्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये दावा करताना लिहिलं आहे, “मी मार्च २०२३ मध्येच भविष्यवाणी केली होती. मी ग्रह ताऱ्यांच्या हालचालींवरुन केलेले भाकीत आज खरे ठरले. भाजप सरकारला बाहेरचा रस्ता दाखवणारा काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.”

हेही पाहा- Karnataka Election Results 2023: कर्नाटकच्या निकालावरुन सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ, लोकांची Creativity पाहण्यासारखी

भविष्यवाणीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

तरुणाच्या या भविष्यवाणीच्या ट्विटवर अनेक लोक कमेंट करत त्याची खूप प्रशंसा करत आहेत. या वर्षी होणाऱ्या आणखी विधानसभा निवडणुकांच्या निकालांबाबतही काही लोकांनी त्या तरुणाला विचारले आहे. तर कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचा विजय होणार, हे तर सगळ्यांनाच माहीत होतं, त्यामुळे या तरुणाच्या ट्विटमध्ये काही विषेश नसल्याचंही काही लोकांनी म्हटलं आहे.