Viral video: सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही असं अनेकदा आपण म्हणत असतो. पण काही व्हिडीओ असे असतात ते पाहून कुठेतरी खरंच माणुसकी अजूनही आहे हे सिद्ध होतं. असाच माणुसकीचं दर्शन घडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिक्षाचालकांच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. रिक्षाचलकाने कधी नकार दिला तर कधी प्रसंगावधान साधून मोठी कामगिरी केल्याच्या बातम्या कायम समोर येतात. दरम्यान अशाच एका रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचं उदाहरण समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकातील म्हैसूर येथे एका रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवत महिलेची सोन्याची चैन परत केली. यासाठी ऑटोचालकाला मोठी कसरत करावी लागली, मात्र शेवटी महिलेपर्यंत पोहोचण्यात त्याला यश आले. वास्तविक, नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये गिरीश नावाच्या ऑटो ड्रायव्हरची कहाणी सांगितली आहे जी कौतुकास्पद आहे. गिरीश हा बेंगळुरूमध्ये ऑटो ड्रायव्हर आहे आणि एक प्रामाणिक व्यक्तीही. रिक्षाचाल गिरीशच्या रिक्षामध्ये चित्रा नावाची एक महिला बसली होती, जी लोकांना ऑटो रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची संस्थापक आहे. चित्रा सांगते की ती म्हैसूरहून बंगलोरला काही कामासाठी गेली होती, जेव्हा ती म्हैसूरला परतली तेव्हा तिला जाणवले की तिची सोन्याची चैन कुठेतरी हरवली आहे. यानंतर ती खूप तणावात होती, पण तिला हे माहिती नव्हते की तिची सैन्याची चैन एका प्रामाणिक ऑटो चालकाच्या हातात आहे जो लवकरच तिला परत करायला येणार आहे.

ऑटो चालकाने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला

रिक्षाचालक गिरीशला चैन मिळताच त्यानं ती परत करण्याची धडपड सुरू केली आणि म्हैसूर गाठले. यानंतर तो तिच्या शोधात चित्राच्या घरी पोहोचला आणि तिला तिची सोन्याची चैन परत केली. यानंतर महिलेने स्वत: एक व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला आणि संपूर्ण घटना लोकांना सांगितली. ऑटोचालक गिरीशचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> झालं का फिरुन? सीआरपीएफ जवानाने बायकोला बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं; VIDEO पाहून बसेल धक्का

हा व्हिडिओ नगारा मीटरेड ऑटो नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. ऑटो चालकाबद्दल यूजर्स वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत.एका यूजरने लिहिले… आम्ही गिरीशजींच्या भावनांचा आदर करतो. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…माणुसकी अजूनही जिवंत आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले…आजच्या काळात असा हिरा शोधणे खूप अवघड आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka auto driver finds the house of passenger to return her missing gold chain receives accolades video viral srk