मुलींना मेकअप करायला खूप आवडत, त्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सर्वात आधी आपल्या मेकअपची तयारी करतात. अशातच जर स्वत:च्या लग्नात मेकअप करायचा असेल तर त्यासाठी त्या खूप पैसेही खर्च करतात पण एखाद्या चांगल्या ब्युटीशियन वाल्याकडून मेकअप करुन घेतात. पण सध्या एका नववधुचा चेहरा मेकअपमुळे भाजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कर्नाटकातील हासनमध्ये घडली आहे. तर सध्या या नववधूला हॉस्पिटलमध्ये आयसीयू विभागात ठेवण्यात आलं आहे.
हेही पाहा- डिजेचा कर्कश आवाज ठरला नवरदेवाच्या मृत्यूचं कारण, वधुच्या गळ्यात हार घातला आणि स्टेजवरच…
वधूचा चेहरा खूप भाजल्यामुळे तिला ICU मध्ये दाखल केल्याचं सांगण्यात आलं आहे. तर पोलिसांनी ब्युटीशियनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यावेळी मुलीचा चेहरा सजवणारे केमिल कोणते होते असा प्रश्न त्याला विचारण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मेकअपमुळे चेहरा खराब झालेली मुलगी जजूर गावची रहिवासी आहे. पीडितेचे लग्न ठरले होते, लग्नाच्या १० दिवस आधी तिने गंगाश्री हर्बल ब्युटी पार्लर आणि स्पा सेंटरमध्ये मेकअप करून घेतला. मेकअप केल्यानंतर पीडितेचा चेहरा सुजला होता. चेहऱ्यावरील तेजही गेले होते.
सुंदर मेकअपचे आश्वासन देत चेहरा केला खराब –
ब्युटीशियन गंगा हिने पीडितेला सांगितले होते की, ती नवीन पद्धतीने मेकअप करत आहे. चेहरा खराब झालेल्या मुलीच्या घरच्यांनी लग्न पुढे ढकलले असून पोलिसांनी ब्युटीशियनवर गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू केला आहे.