संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली असून स्वबळावर सत्ता स्थापन करेल असं चित्र निर्माण झालं आहे.दरम्यान, आता भारतीय जनता पार्टीने त्यांचा कर्नाटकमधला पराभव मान्य केला आहे.यानुसार काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल आणि यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील ३८ वर्षे जुनी परंपरा कायम राहिली. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे.यावरून आता सोशल मीडियावर मीम्सचा जणू महापूर आला आहे. मिम्स शेअर करून लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
एवढ्या मोठ्या निवडणुकीचे पडसाद सोशल मीडियावर उमटणार नाहीत असं होऊ शकतं का? अनेक राजकीय नेत्यांकडून या निर्णयावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र सोशल मीडियावर यूजर्सकडून येणाऱ्या भन्नाट- भन्नाट प्रतिक्रियादेखील वाचण्यासारख्या आहेत. चला तर मग एक नजर टाकुयात.