एक रुपयात काय येते? असे म्हणणारे तुम्हाला अनेक भेटतील पण हुबली येथे राहणा-या गरिबांना मात्र एक रुपया फार मोलाचा वाटतो कारण याच एक रुपयात त्यांना पोटभर अन्न मिळते. १००, ५०० आणि २ हजारांच्या तुलनेत आपल्याला एक रुपयांचे अप्रुप आणि महत्त्व काय वाटणार म्हणा? पूर्वी निदान लांब असलेल्या माणसांशी संपर्क साधण्यासाठी उपयोगी ठरायचा तो हाच एक रुपया. पण, हळूहळू आपल्यासाठी या एक रुपयाचे महत्त्व कमी झाले. पण कर्नाटकमधल्या हुबली येथील गरिब, भिकारी आणि कामगारांसाठी मात्र हा एक रुपया खूपच मोलाचा आहे कारण एक रुपयात ते पोटभर अन्न येथील ‘रोटी घर’ मधल्या कँटीनमध्ये जेवू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : फक्त एक १ रुपयात साडी; नियम आणि अटी लागू

वाचा : भारतीय शेफच्या जेवणावर खूश होऊन व्यावसायिकाने दिली तब्बल ८३ हजारांची टीप

गरीबांना पोटभर आणि सकस अन्न मिळावे यासाठी कर्नाटकमधली हुबली येथे महावीर युथ फेडरेशनने गेल्या सहा वर्षांपासून नवीन उपक्रम हाती घेतला आहे. येथील गरीबांना ते १ रुपयांत पोटभर अन्न देत आहे. गेल्या सहा वर्षांपासून येथे अनेक लोक जेवत आहेत. ऑफिसला जाणारे कर्मचाऱ्यांपासून कामगार, गरिब असे अनेक जण रोटी घरमध्ये जेवतात. एक रुपयात दाळ, भात, चपाती, भाजी येथे मिळते. सणाच्या दिवसात कधी कधी गोडाचा पदार्थही दिला जातो.
यापूर्वी महावीर युथ फेडरेशनने गरिबांसाठी मोफत रुग्णालय सुरु केले होते. पण डॉक्टर नसल्याने त्यांना आपला हा उपक्रम मध्येच बंद करावा लागला. पण त्यांच्या रोटी घरला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. तामिळनाडूमध्ये स्वर्गीय जयललिता यांनी गरीबांना कमी दरात आहार मिळावा यासाठी अम्मा कँटीन सुरु केले होते. येथे १ रुपयांपासून ते ५ रुपयांपर्यंत इडली, सांबार, भात मिळत असे.

वाचा : ‘मॅकडॉनल्डस्’मध्ये मिळणार मसाला डोसा आणि अंडा बुर्जी बर्गर