३ जुलै रोजी मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘मिस इंडिया २०२२’ चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता. यानंतर भारताला नवी ‘मिस इंडिया २०२२’ मिळाली आहे. कर्नाटकची सिनी शेट्टी ‘मिस इंडिया २०२२’ची विजेता ठरली आहे. एका शानदार प्रक्रियेनंतर सिनी शेट्टी हिने ‘मिस इंडिया’चा मुकुट आपल्या नावावर केला. त्याचबरोबर, राजस्थानची रुबल शेखावतला मिस इंडिया २०२२ मध्ये फर्स्ट रनर अप घोषित करण्यात आले, तर उत्तर प्रदेशच्या शिनाता चौहान हिला सेकंड रनर अपचा मुकुट देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर्षीच्या मिस इंडिया स्पर्धेत ३१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. वेगवेगळ्या राज्यातील मॉडेल्स ‘मिस इंडिया २०२२’चा मुकुट आपल्या नावे करण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या. यांच्या दरम्यान चुरशीशी स्पर्धा रंगली होती. आपल्या सौंदर्याने आणि बुद्धीने या सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांना घायाळ केले. दरम्यान या संपूर्ण स्पर्धेत काही मॉडेल्सचे नाव चर्चेत राहिले. यामध्ये झारखंडच्या रिया तिर्की हिचा देखील समावेश आहे.

ऐकावं ते नवलंच! ‘या’ महापौराने चक्क मगरीशी बांधली लग्नगाठ; जाणून घ्या, काय आहे प्रकरण

काल ‘मिस इंडिया २०२२’च्या ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूडच्या अप्सरांनी देखील हजेरी लावली होती. या संपूर्ण इव्हेंटमध्ये मलायकानं आपल्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अनेकांनी तिच्या या लुकचं कौतुक केलं तर काहींना मात्र तिचा हा लुक अजिबात आवडलेला नाही. दरम्यान, नेहा धुपियाने सिल्व्हर गाऊनमध्ये दिसली. ब्लॅक अँड व्हाईट कलर आउटफिटमधला क्रिती सॅननचा लूकही खूपच सुंदर दिसत होता.

पाहा व्हिडीओ –

मिस इंडिया २०२२ ग्रँड फिनालेमधील जजच्या पॅनेलमध्ये एक नव्हे तर सहा सेलिब्रिटींचा समावेश होता, ज्यामध्ये मलायका अरोरा, नेहा धुपिया, दिनो मोरिया, राहुल खन्ना, रोहित गांधी आणि शामक दावर जज म्हणून सामील झाले होते. इतकेच नाही तर भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज देखील या पॅनेलमध्ये होती.

दरम्यान, ३१ मॉडेल्सना मागे टाकून कर्नाटकच्या सिनी शेट्टीने मिस इंडिया २०२२चे खिताब पटकावले आहे. यानंतर #SiniShetty हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. सिनी शेट्टीने विजेतेपद पटकावताच सोशल मीडियावरही तिला अभिनंदन करणाऱ्या कमेंट्सचा पूर आला आहे. सोशल मीडिया, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सर्व प्लॅटफॉर्मवर सिनी शेट्टीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.