शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संबंध अतिशय आदर्श मानले जातात. गुरूला विद्यार्थी प्रिय असतो आणि विद्यार्थ्यांसाठी गुरू दैवत असतो. परंतु बदलत्या काळानुसार गुरू-शिष्याची ही व्याख्याही बदलत चालली आहे. याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. विद्यार्थ्यांनीच शिक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली. बरं या विद्यार्थ्यांचा प्रताप इथेच संपत नाही तर वर्गात असलेला कचऱ्याच्या डब्ब्यानेच शिक्षकाला मारलं. त्यातही या विद्यार्थ्यांच्या मनाचं समाधान झालं नाही. या विद्यार्थ्यांनी डब्ब्यातला कचरा त्या शिक्षकाच्याच डोक्यावर फेकला. या घटनेचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता याप्रकरणी कठोर कारवाईला सुरूवात झाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी तालुक्यातल्या नल्लूर इथल्या शासकीय माध्यमिक शाळेतला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शाळेतील पाच विद्यार्थी शिक्षकांसोबत गैरवर्तन करताना दिसून येत आहेत. सुरूवातीला हे पाचही विद्यार्थी वर्गात प्रवेश करतात आणि खुर्चीवर बसलेल्या हिंदी शिक्षकासोबत गैरवर्तन करू लागतात. यातल्या एका विद्यार्थ्याने तर वर्गात असलेला कचऱ्याचा डब्बाच उचलला आणि शिक्षकाला मारहाण करू लागला. नंतर शिक्षक वर्गात शिकवू लागल्यावर या पाच विद्यार्थ्यांनी डोक्यावर डब्ब्यातला कचरा टाकला.
आणखी वाचा : चक्क दारूची बॉटल घेऊन वरातीत मुलीचा भन्नाट डान्स; VIRAL VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण
या घटनेबाबत बोलताना शिक्षक म्हणाले की, ३ डिसेंबर रोजी वर्गात गुटख्याची पाकिटे पडलेली आढळली. यावरून शिक्षकाने त्या विद्यार्थ्यांना वर्गात गुटख्याची पाकिटे फेकू नका असं सांगत वर्गात शिस्त पाळण्यास सांगितलं. याचाच राग मनात धरत या बेशिस्त विद्यार्थ्यांनी वर्ग सुरू असताना गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलिसात तक्रार केल्यास त्रास होऊ शकतो, अशी भीती शिक्षकाला वाटत असल्यामुळे त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
आणखी वाचा : सर्वात मोठी विषारी कोळी जाळं कशी विणते? कधी पाहिलंय का? पाहा हा VIRAL VIDEO
आणखी वाचा : शाळेतील शिक्षकाचा डान्स पाहून हॉलिवूड स्टारही थक्क, पाहा २ कोटी लोकांनी पाहिलेला VIRAL VIDEO
याची माहिती मिळताच आमदार मदल विरुपक्षप्पा आणि सार्वजनिक शिक्षण विभागाचे उपसंचालक जीआर थिप्पेस्वामी यांनी तातडीने शाळेत पोहोचून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही, असं लेखी निवेदन त्यांनी विद्यार्थ्यांकडून घेतलं आहे. आता कर्नाटक सरकार याप्रकरणी कठोर दिसत आहे. शालेय विद्यार्थ्यांची शिक्षकासोबतचं अशा प्रकारचं गैरवर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, असं कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांमध्ये नाराजी
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शिक्षकांनी पोलिसांत तक्रार न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या घटनेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना बदलीचं प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सोबतच त्यांच्यावर कारवाईची मागणी करत पोलिसांत तक्रार करण्याची मागणीही केली. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना उपायुक्त महांतेश बिलगी यांनी सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडून अहवाल मागवणार असल्याचं सांगितलं. अहवालाच्या आधारे ते योग्य ती कारवाई करतील, असं देखील सांगण्यात येत आहे.