संकटाच्यावेळी जो धावून येतो तो खरा देवमाणूस असतो असे आपल्याकडे मानतात. एखाद्याला मदतीची गरज असेल तेव्हा त्याची मदत करणे हीच खरी माणुसकी आहे मग तो कोणीही असो. आपल्या आसपास कित्येक नकारात्मक गोष्टी घडत असतात पण अशावेळी एखादी घटना अशी असते ती आपल्याला सकारात्मकता देते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेची चर्चा सुरु आहे. कर्नाटकमध्ये बसमध्ये प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेला अचानक प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. अशावेळी या महिलेच्या मदतीला महिला कंडक्टर धावून आली. योग्य वेळी मदत करून महिला कंडक्टरने या महिलाला आणि तिच्या बाळाला जीवदान दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकमधील बंगळूरू चिकमागालुर रस्त्यावरील ही घटना आहे. कर्नाटकच्या स्टेट बसमध्ये प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेला अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्या. अशामध्ये बसमध्ये उपस्थित महिला कंडक्टरने ताबडतोब सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर जाण्यास सांगितले. या महिला कंडक्टरचे नाव एस. वसंतम आहे. त्यांनी अतिशय सुज्ञपणे आणि धैर्याने परिस्थितीचा सामना केला आहे आणि गर्भवती महिलेला बाळाला जन्म देण्यासाठी मदत केली.

हेही वाचा – आता जोडप्यांना अंतराळात करता येणार लग्न! Space Weddingची अनोखी सुविधा कधी सुरू होणार, जाणून घ्या

एवढंच नव्हे तर या महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची होती म्हणून त्याच बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांच्या मदतीने १५०० रुपये जमा करुन तिला दिले. नंतर महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती देखील केले.

हेही वाचा- आता जोडप्यांना अंतराळात करता येणार लग्न! Space Weddingची अनोखी सुविधा कधी सुरू होणार, जाणून घ्या

महिला कंडक्टरची माणुसकी पाहून कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर जी सत्यवती यांनीही तिचे कौतुक केले. तसेच त्या म्हणाल्या की, ”हे माणुसकीचे खरे उदाहरण आहे. महिला कंडक्टरने खूप कोतुकास्पद काम केले आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka woman conductor helps woman passenger deliver baby ksrtc bus snk
Show comments