Kashmiri Girl Bullet Riding Video Viral : केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवलं होतं. त्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाख अशी दोन केंद्रशासित राज्ये तयार करण्यात आली होती. मात्र, कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर ११ जुलैला सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओत हिजाब घातलेली एक तरुणी बुटेल चालवताना दिसत आहे. काश्मीरमध्ये ३७० कलम हटवल्यामुळे त्या तरुणीने ट्वीटरवर पोस्ट शेअर करत भारत सरकारचे आभार मानले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओला लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुसरत फातिमा नावाच्या एका ट्वीटर हॅंडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

नक्की वाचा – ४९२ फूट लांब रस्सीवर चालला अन् मरीना टॉवर्सवर इतिहास रचला, तरुणाचा थरारक व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, माझं काश्मीर आता खूप बदललं आहे. फक्त मुलांसाठीच नाही तर आमच्यासाठीही. त्यामुळे मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतोय. ३७० आणि ३५ अ कलम हटवल्यानंतरच हे शक्य झालं. त्यामुळे मी भारत सरकारचं आभार मानते. ट्वीटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओत फातिमा बुलेट राई़ड करताना दिसत आहे. तरुणीचा बुलेट राईड करतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे.

इथे पाहा काश्मिरी तरुणीचा बुलेट रायडिंगचा व्हिडीओ

तिने हेल्मेट घातलेला नाही आणि अधूनमधून दुचाकीचा हॅंडल सोडत असल्याचंही पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सने संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काही यूजर्सने म्हटलं की, सर्वकाही ठीक आहे पण हेल्मेट घालणे अत्यंत गरजेचं आहे. दुसरा यूजर म्हणाला, तुम्हाला पाहून आनंद वाटला. पण तुम्ही आनंद साजरा करण्यासाठी जी पद्धत वापरली आहे ती तुम्हाला धोक्यात टाकू शकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmir girl wearing hijab bullet riding video viral thanks to indian government for cancelation of article 370 narendra modi nss
Show comments