Shocking video: व्हायरल होण्याच्या शर्यतीत, लोक ट्रेंडिंग गाण्यांवर नाचण्यापासून ते वेगवेगळ्या स्टंटपर्यंत सर्व काही करून पाहतात. अशाच एका कश्मिरी महिलेने रीलसाठी अक्षरशः स्वत:चा जीव धोक्यात घातलाय. आजकाल तरुणांमध्ये रील्स बनवण्याची प्रचंड क्रेझ आहे. ते कुठेही असले तरी, जे काही करत आहेत ते ते कॅमेऱ्यात कैद करतात आणि नंतर ते विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात. त्यांना रील्स बनवण्याचे इतके वेड आहे की कधीकधी ते अशा गोष्टी करतात ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो.सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात.
अशाच एका तरुणीला आपला जीव धोक्यात घालून रील बनवणं चांगलंच महागात पडलंय. रील बनवण्यासाठी चक्क झाडाच्या टोकावर जाऊन फांदीवर बसली आहे. याचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ‘इशकजादे’ चित्रपटातील ‘जल्ला वाल्ला’ या लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर या व्हिडिओमध्ये ती एका उंच झाडावर आत्मविश्वासाने नाचताना दिसते. जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये झाडाच्या फांदीवर सहजतेने नाचताना दिसतेय. सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रीलमाफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच; पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक तरुणी उंच डोंगरावर एका झाडाच्या टोकावर रील बनवत होती
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ushanagvanshi31 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने म्हटले की, “हे लोक मूर्ख आहेत.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “आजकाल सगळे आकाशात उडत नाहीत तर सोशल मीडियावर उडत आहेत.”