महावितरण आणि पावसाळा यांचा ३६ चा आकडा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे पावसाळ्यामध्ये विजपुरवठा खंडित झाला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं इतकं हे नातं घट्ट आहे. मात्र वीज जाण्यासाठी पावसाची आवश्यकता असतेच असं नाही. दिव्याखाली अंधार अशी मराठीत एक म्हण आहे, तिचाच प्रत्यय संगीतकार कौशल इनामदार यांना आला. यासंदर्भातील अनुभव त्यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे.
झालं असं की, कौशल इनामदार सोमवारी वीज बिल भरण्यासाठी महावितरणाच्या कार्यालयामध्ये गेले होते. मात्र विरोधाभास म्हणजे या कार्यालयामध्येच वीज नसल्याने ग्राहकांचा खोळंबा झाला. याचसंदर्भात इनामदार यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली. “मी महावितरणाच्या कार्यालयामध्ये वीज बिल भरण्यासाठी आहे. येथील प्रक्रिया विलंबाने सुरु आहे कारण इथे कार्यालयामध्ये वीज पुरवठा खंडित झालाय,” असं इनामदार यांनी ट्विट केलं.
I am in a mahavitaran office to pay the electricity bill and there is a delay here because there is no electricity in their office!
— Kaushal S Inamdar| कौशल इनामदार (@ksinamdar) June 28, 2021
विशेष म्हणजे इनामदार यांनी केलेलं हे ट्विट व्हायरल झालं असून २४ तासांच्या आत ३०० हून अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे तर अडीच हजार जणांनी ते लाईक केलंय. मात्र या ट्विटसोबतच अनेकांनी कौशल इनामदार यांना तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन बिल का भरलं ऑनलाइन बिल भरावं ना असा प्रश्न विचारला.
१)
bhau do it online
— Chandra Shekhar (@WhosTruthAnyway) June 28, 2021
२)
Is this some. Kind of joke? And why you had to visit their ऑफिस when you can pay online?
— नेत्रा डाऊ (@onlyonenetra) June 28, 2021
३)
Aho online bharavit bills. Covid madhe office madhe jaun bill payment ka?
— Dr Pyaricetamol (@SatanKiNani) June 28, 2021
४)
You can pay online…never went to their offices or Bharna Kendras till now…
— Citizen of Bharat (@heartfe32156176) June 28, 2021
५)
ऑनलाइन पे करत नाही?
— Pravin (@thatPunekar) June 28, 2021
तर अनेकांनी महावितरणाची खिल्ली उडवल्याचं आणि मजेदार उत्तरं दिल्याचंही पहायला मिळालं.
१) बुडाखाली अंधार…
महावितरणच्या बुडाखाली अंधार however jokes apart, Mahavitaran has developed most efficient software and consumer use it meticulously there will be no complaints @MAHADISCOM appreciate your support.
— Col Satish R Tapaswi, Retd (@Col_Satish_Retd) June 28, 2021
२) हे म्हणजे असं झालं की…
I went to a liquor shop to buy some liquor – there was a delay because the staff was drunk
— Sameer (@BesuraTaansane) June 28, 2021
३) व्यवस्था सुधारण्याची गरज
दिव्या खाली अंधार असे उगाच नाही म्हणत!
I sense a genuine need to upgrade all government offices with decent data connection, power back, decent furniture, clean toilets, and courteous approach. How can the citizens feel welcome in absence of these basic infrastructure needs.— Vidyadhar Purandare (@vidyadharP1) June 28, 2021
४) त्यांनीच बिल भरलं नव्हतं…
Looks like they haven’t paid their electricity bill yet
— @iamnamo (@namitawagle) June 28, 2021
५) सगळी वीज वितरीत केली…
कारण त्यांनी त्यांच्याकडे असलेली सगळी वीज वितरण करून टाकली. खरंच किती निःस्वार्थ सेवा आहे त्यांची
— Rahul Shiledar (@rahulshiledar) June 28, 2021
६) इथे घराणेशाही नाही हे बरं आहे
At least there is no partiality or nepotism
— Advait Kurlekar (@AdvaitKurlekar) June 28, 2021
७) प्रामाणिकपणा…
बिल नसेल म्हणुन वीज connection कट केले असणार.
आणखी किती प्रामाणिक होऊ शकतं कोणी— Misquote (@Misquote9) June 28, 2021
८) किती अपमान…
ले MSEB ऑफिस तो कौशल इनामदार pic.twitter.com/dkqKGzRgpr
— SaM Hawaka Zhoka(@Sameerm79456326) June 28, 2021
९) तिकडे पाऊस पडत असणार…
बहुतेक @MSEDCL ऑफिसमधेच पाऊस पडतोय
आणि
पावसाचे 4थेंब पडल्या पडल्या वीज खंडीत करण्याच्या सवयीने तिथे वीजपुरवठा खंडीत केला असेल.— दत्तात्रय माळी Dattatray Mali (@imDattatrayMali) June 28, 2021
१०) एमटीएनएलवाले पण फोन उचलत नाहीत
Just like they don’t pick telephones in @MTNLOfficial office.
— Shaktimaan (@tamrajkillvish) June 28, 2021
या ट्विटवर सर्वाधिक उपस्थित करण्यात आलेली शंका म्हणजे कौशल इनामदार यांनी ऑनलाइन बिल का नाही भरलं. त्याला उत्तर देताना कौशल यांनी, मला रिकनेक्शन फीसुद्धा भरायची असल्याने मी कार्यालयात जाऊन बिल भरल्याची माहिती दिली. करोना लॉकडाउनमुळे बराच काळ मी माझ्या ऑफिसमध्ये न गेल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचंही कौशल यांनी सांगितलं.
I had to pay reconnection fee because I hadn’t visited my office for a long time due to Lockdown
— Kaushal S Inamdar| कौशल इनामदार (@ksinamdar) June 28, 2021
कौशल यांच्या या रिप्लायवर एमएसईबीच्या मोबाईल अॅप्लिकेशनवरुन ही फीसुद्धा भरता येत असल्याचं काहींनी त्यांना सांगितलं. एकंदरितच कौशल इनामदार यांनी छेडलेल्या नाराजीच्या सुरावर त्यांच्या फॉलोअर्सनी वरचा सा लावत एमएसईबीची चांगलीच फिरकी घेतल्याचं या ट्विटखालच्या रिप्लायमध्ये पहायला मिळालं.