Auto Driver Uses KBC Style Question: करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसी (KBC). सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन या शो चं होस्ट करतात. अमिताभ बच्चन त्या विशेष खुर्चीवर बसून स्पर्धकाला चार पर्याय देऊन प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायला सांगायचे. तर आज सोशल मीडियावर या शोप्रमाणेच एक खास गोष्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका चालकाने केबीसी स्टाईलमध्ये रिक्षाच्या मागे एक खास प्रश्न लिहिला आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून चार पर्यायसुद्धा दिले आहेत.
गजबजलेल्या रस्त्यांवर सततच्या हॉर्नमुळे हैराण झालेल्या एका ऑटोचालकाने ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याचे काम स्वतःच्या हाती घेतले आहे. भांडण, हाणामारी करण्याऐवजी त्याने एक अनोखा मार्ग स्वीकारला. लोकप्रिय गेम शो कौन बनेगा करोडपती (KBC)च्या स्टाईलमध्ये त्याच्या ऑटोच्या मागील बाजूस एक विचार करायला लावणारा प्रश्न लिहिला आहे; ज्याला उत्तरांचे चार पर्याय दिले आहेत. नक्की रिक्षाचालकाने कोणता प्रश्न लिहिला आणि उत्तर म्हणून कोणते चार पर्याय दिले आहेत ते एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा.
पोस्ट नक्की बघा…
रिक्षा चालकाने विचारला केबीसी (KBC) स्टाईलमध्ये प्रश्न:
पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, रिक्षाचालकाने ‘ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजवल्यावर काय होते’, असा प्रश्न रिक्षाच्या मागे लिहिला आहे. या प्रश्नाला उत्तर म्हणून १. “ट्रॅफिक लाइट लवकर हिरवी होते”, २. “रस्ता रुंद होतो”, ३. “गाडी उडायला लागते”, ४. “काहीच नाही”, असे चार मजेशीर विचार करण्यास प्रवृत्त करणारे पर्याय देण्यात आले आहेत. म्हणजेच ट्रॅफिकमध्ये एखादा चालक विनाकारण हॉर्न वाजवायला जाईल तेव्हा त्याच्या नजरेत रिक्षाच्या मागे लिहिलेला हा प्रश्न आणि त्याच्या उत्तराचे चार पर्याय समोर येतील.
सोशल मीडियावर ही पोस्ट @upscworldofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. नेटकरी ही पोस्ट पाहून रिक्षाचालकाचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत आणि काही जण मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करतानाही दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, मी पाचवा पर्यायसुद्धा देतो की, असे केल्याने ‘पुढचा ड्रायव्हर चिडतो’ आदी अनेक मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. एकूणच सोशल मीडियावर या पोस्टने अनेक वाहनचालकांना विचार करायला भाग पाडले आहे.