T20 World Cup 2022: टी-२० विश्वचषक २०२२ च्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला अवघे दोन दिवस आहेत. भारतीय संघ मोठ्या ताकदीने यंदाच्या विश्वचषकात उतरणार असून मागील विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या टीम इंडिया मेलबर्न येथे सरावात गुंतलेली आहे. शनिवारी, २२ ऑक्टोबर पासून विश्वचषकाचे सुपर १२ चे सामने सुरु होणार आहेत व रविवारी भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. दिवाळीआधीच टीम इंडिया कोट्यावधी भारतीयांना विजयाचे गिफ्ट देणार का हे पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. अशातच बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी सुद्धा रोहित शर्माच्या ब्रिगेडसाठी खास कवितेतून शुभेच्छा दिल्या आहेत.
केबीसीच्या सेटवरून अमिताभ यांनी ही कविता सादर करत यातून टीम इंडियाला पुन्हा एकदा आम्हाला २०११ चा आनंद परत अनुभवण्याची संधी द्या, तुम्ही वर्ल्डकप पुन्हा एकदा भारतात घेऊन या असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी यांच्या भारदस्त आवाजात ही कविता ऐकून तुमच्याही अंगावर शहारा आल्यावाचून राहणार नाही. चला तर मग पाहुयात
अमिताभ बच्चन यांनी टीम इंडियासाठी केलेली खास कविता…
Video: फॅन्सचं प्रेम, कोहलीला अडथळा; विराटने विनंती करूनही चाहते ऐकले नाहीतच उलट…
दरम्यान, भारताने २०२२ मध्ये ३५ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात २६ विजय आणि आठ पराभव आहेत. एका वर्षात सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम घेऊन आता भारतीय संघ टी २० विश्वचषकात दाखल झाला आहे. २३ ऑक्टोबरला भारत पाकिस्तानला धूळ चारून आशिया चषक व गत विश्वचषकातील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.