Kedarnath temple opening date: भारतात १२ ज्योर्तिलिंगांना विशेष महत्त्व आहे. चारधाम यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. केदारनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम असून १२ ज्योर्तिलिंगापैकी खूप महत्त्वाचे मानले जाते. केदारनाथचे दरवाजे हे सहा महिन्यांसाठी बंद असतात तर सहा महिने ते भक्तांसाठी उघडले जातात. केदारनाथमधील भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन हे दरवाजे बंद ठेवले जातात. गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडताच चारधाम यात्रेची सुरुवात होते. आता बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने केदारनाथ धामचे दरवाजे कधी उघडले जाणार याची तारीख जाहीर केली आहे.
अकराव्या ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ धामचे दरवाजे यावर्षी १० मे रोजी सकाळी ७ वाजता यात्रेकरूंसाठी उघडतील. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ही घोषणा करण्यात आली. केदारधामचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याने त्याची जोरदार तयारी केदारनाथ मंदिर परिसरात सुरु आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांच्या उपस्थितीत आज झालेल्या धार्मिक कार्यक्रमात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. उत्तराखंडमधील उखीमठ येथील श्री ओंकारेश्वर मंदिरात हा सोहळा पार पडला. हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टीमुळे सर्व मार्ग सहा महिने बंद करून मूर्ती उखीमठ येथे स्थलांतरित केली जाते. एप्रिल किंवा मे महिन्यात ती पुन्हा स्थापित केले जाते.केदारनाथचे दरवाजे दिवाळीच्या दोन दिवसांनंतर हिवाळ्याच्या हंगामासाठी बंद केले जातात आणि एप्रिल किंवा मेमध्ये पुन्हा उघडले जातात. यंदा दोन हजार पाचशे भाविकांच्या उपस्थितीत १५ नोव्हेंबरला मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले.
हेही वाचा >> “आई कधीच गरीब नसते” रस्त्याच्या कडेला बसलेल्या माय-लेकाचा व्हायरल VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
केदरनाथ देशभरातून लोक दर्शनासाठी येतात. केदारनाथ येथे दरवर्षी हजारो भाविक भगवान शंकराची पूजा करण्यासाठी येतात. उत्तराखंडमधील चार धाम यात्रा ही एक लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्र आहे. त्यात हिमालयातील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार पवित्र स्थळांच्या समाविष्ट आहे.केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते.