३ मे रोजी चारधाम यात्रा (Chardham Yatra) सुरू झाल्यानंतर केदारनाथसह चारही धामांमध्ये भाविकांची गर्दी वाढत आहे. केदारनाथमध्ये (Kedarnath) मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने व्यवस्था सांभाळण्यासाठी आयटीबीपी (ITBP) तैनात करण्यात आले आहे. आयटीबीपीच्या जवानांनी बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तैनात होताच रांगेत उभे करून संपूर्ण सुरक्षा व्यवस्था आपल्या हातात घेतली आहे.
आयटीबीपीने केदारनाथ परिसरात आपल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला सतर्क केले आहे. एवढेच नाही तर २ सिलिंडर असलेले वैद्यकीय पथकही येथे विविध भागात तैनात करण्यात आले आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर, यावेळी मोठ्या संख्येने भाविक येथे पोहोचू शकतील, याची प्रशासनाला आधीच कल्पना होती.
(हे ही वाचा: ‘लेडी पुष्पा, मैं हटेगी नहीं’ स्कूटीवर स्वार महिलेचा भन्नाट Video सोशल मीडियावर व्हायरल)
आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक कुमार पांडे यांनी सांगितले की, केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी येथे लष्कर तैनात करण्यात आले आहे. यावेळी मंदिरात दररोज २० हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. सोनप्रयाग, उखीमठ आणि केदारनाथमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते.
(हे ही वाचा: Video: मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर Free Food साठी शिक्षकांमध्ये राडा; प्लेट हिसकावण्यापासून ते…)
(हे ही वाचा: थरारक! हिमाचलच्या डोंगरदऱ्यातून बस चालवणाऱ्या ड्रायव्हरचा Video Viral)
६ मे रोजी चारधाम यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत १ लाख ३० हजारांहून अधिक भाविकांनी केदारनाथ मंदिरात दर्शन घेतले आहे. याशिवाय बद्रीनाथ मंदिरातही भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था सुधारण्यासाठी ITBP मंदिर आणि नागरी प्रशासनासोबत काम करत आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडून चारधाम यात्रेला सुरुवात झाली. केदारनाथ धामचे दरवाजे ६ मे रोजी, तर बद्रीनाथ धामचे दरवाजे ८ मे रोजी उघडण्यात आले. येत्या काही दिवसांत परिसरात पाऊस पडल्यानंतर प्रवास कठीण होऊ शकतो.