भारतातील प्रसिद्ध १२ ज्योर्तिलिंगांना खूप महत्त्व आहे. केदारनाथ या पैकीच एक पवित्र स्था असून अनेक फक्त दरवर्षी मोठ्या संख्येने भेट देतात. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन केदारनाथचे दरवाजे हे सहा महिन्यांसाठी बंद असतात तर सहा महिन्यांसाठी ते भक्तांसाठी उघडले जातात. आता बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने केदारनाथ धामचे दरवाजे कधी उघडले जाणार याची तारीख जाहीर करतात. अकराव्या ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ धामचे दरवाजे यावर्षी १० मे रोजी सकाळी ७ वाजता यात्रेकरूंसाठी उघडण्यात आले आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने भक्त केदारनाथच्या दर्शनासाठी निघाले आहेत. सोशल मिडियावर भक्तांची गर्दीचे आणि वाहतूक कोंडीचे व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. दरम्यान सध्या केदारनाथ मंदिर परिसरात एका जखमी झालेल्या महिलेला डॉक्टरांची मदत न मिळाल्याने संतापलेल्या नातेवाईकांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये केदारनाथ मंदिराच्या दिशेने घोड्यावर बसून निघालेल्या महिलेला दुखापत झाली. घोड्यावरून पडल्यामुळे महिलेच्या डोक्याला आणि खांद्याला मोठी दुखापत झाली आहे. तेथील डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी प्रथमोपचार न करता मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितल्याचा दावा केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये जखमी महिलेची नातवाईक असलेली महिला सरकार आणि केदारनाथ यात्र व्यवस्थापन समितीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मंदिर परिसरात भक्त जखमी झाल्यास त्याच्यावर प्राथमिक उपचार देखील केले जात नाही असा आरोप या महिलेने केला आहे.
व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर chardham_yatra_2024 नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “केदारनाथ यात्रा व्यवस्थेचा भांडाफोड. इंदूर येथील महिला यात्रेकरूने रडत रडत मांडली आपली व्यथा” असे लिहिले आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी महिलेला घोड्यावर बसून प्रवास करण्यावर टिका केली तर काहींनी स्वत:बरोबर प्रथमोचार साहित्य न ठेवल्याबद्दल टिका केली. काहींनी सरकार आणि व्यवस्थापन समितीच्या कारभारावर टिका केली.
हेही वाचा – “याला काय अर्थ नाही”, भाड्यासाठी रिक्षाचालकासह करावी लागणार भावतोल, Olaवर ग्राहक नाराज
एकाने कमेटं केली की, ” जे लोक शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त आहेत त्यांनीच श्री केदारनाथला जावे.” दुसऱ्याने लिहिले, “कोणी सांगितले होते घोड्यावर स्वार होऊन जा.. आधी तीर्थ म्हणजे काय ते समजून घ्या.. तीर्थक्षेत्रांना भेट द्यायची असेल तर पायी प्रवास करावा लागेल.”
तिसरा म्हणाला, “हे धाम सरकारचे अपयश आहे, मोठमोठे दावे करून काहीही साध्य होणार नाही.” तिसरा म्हणाला, की” सरकारला फक्त मंदिरातून पैसा मिळवायचा आहे”