Viral Video: दैनंदिन जीवनातील अनेक सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे दैनंदिन कामात काही सोप्या आणि निरोगी सवयी लावणे अत्यंत गरजेचं आहे.तर आज सोशल मीडियावर सुद्धा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर डॉक्टर पूनम देसाई अनेकदा व्हिडीओ शेअर करत असतात. त्या व्हिडीओत मुलांसाठी वैद्यकीय सल्ला आणि आरोग्य टिप्स देत असतात. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी डॉक्टर आणि आई म्हणून कोणत्या तीन गोष्टी टाळल्या पाहिजेत हे सांगितलं आहे.
कोणते तीन उपाय डॉक्टरांनी सांगितले आहेत चला पाहू.
१. घरात चप्पल घालून जाऊ नये – तुम्ही बाहेरुन आल्यावर तुमच्या चपलांना घाण, विष्ठा, माती, कीटकनाशके आणि बरंच काही लागलेलं असते. त्यामुळे घरात चप्पल घालून न येण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
२. प्लास्टिक टपरवेअरमध्ये पदार्थ ठेवणे टाळा – विविध कारणांमुळे प्लास्टिकच्या वस्तूंचे सूक्ष्म कणांत (मायक्रोप्लास्टिक) रूपांतर होते. त्यामुळे प्लॅस्टिक टपरवेअरमध्ये पदार्थ ठेवणे टाळा कारण यामुळे आपल्या अन्नामध्ये मायक्रोप्लास्टिक्सचा नकळत समावेश होऊ शकतो.
३.सुगंधित डिटर्जंट वापरू नका – डॉक्टर नैसर्गिक (परफ्यूम-फ्री डिटर्जंट) डिटर्जंट वापरण्याचा सल्ला देतात. कारण – सुगंधित डिटर्जंटमध्ये phthalates असतात ; जे शरीरातील हार्मोन्स उत्पादनात व्यत्यय आणू शकतात. ज्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ही रसायने प्रजनन समस्या आणि इतर आरोग्यविषयक समस्यांशी जोडलेली आहेत. म्हणून नैसर्गिक पर्याय निवडणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
हेही वाचा…शेवटी वडिलांनाच लेकरांची काळजी! तीन चिमुकल्यांना ट्रॉलीवर बसवण्यासाठी तारेवरची कसरत, पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @doctoranddancer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हे तीन उपाय महिला डॉक्टरने व्हिडीओत स्पष्ट करून कॅप्शनमध्ये सुद्धा नमूद केले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डॉक्टरांच्या टिप्सचं कौतुक केलं आहे आणि त्यांच्या शंका सुद्धा कमेंटमध्ये विचारल्या आहेत.