Viral Video: भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी पाहण्यासाठी परदेशातील अनेक पर्यटक इथे येतात. भारतातील संस्कृती आणि त्याची माहिती जाणून घेण्यासाठी परदेशातील अनेक पर्यटक इच्छुक असतात. पण, अनेकदा असं होत की परदेशी पर्यटकांना आपली भाषा समजत नाही व त्यांना येथील बऱ्याच ठिकाणांची माहिती नसते; त्यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे लागते व इंग्रजी भाषेत समजावून सांगावे लागते. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इथे एका रिक्षाचालकाने परदेशातून आलेल्या ब्लॉगरची मोठ्या मनाने मदत केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यूके ब्लॉगर झक्कीने भारतात प्रवास करत असताना हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रकरण असे की, ब्लॉगरने भारतात राहण्यासाठी जे हॉटेल बुक केले होते तिथे कार्ड मशीन काम करत नव्हते, त्यामुळे हॉटेल मालकांनी त्यांना एटीएमला जाण्यास सांगितले. ब्लॉगरला एटीएम कुठे आहे याची कल्पना नव्हती. तेव्हा एका रिक्षाचालकाने त्याची मोठ्या मनाने मदत केली. रिक्षाचालक आणि परदेशातील तरुणाचा संवाद एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…नातं स्वतःशीच! जेव्हा लेक निबंध लिहिते अन् आई कौतुक करते… पाहा पोस्ट

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ब्लॉगर जेव्हा रस्त्यावर एटीएम शोधत होता, तेव्हा रिक्षाचालक तुम्हाला कुठे जायचं आहे का असे विचारतो? तेव्हा ब्लॉगरच्या मनात शंका येते. पण, हळूहळू संवाद साधल्यानंतर त्याला रिक्षाचालकावर विश्वास बसतो आणि तो जवळ कुठे एटीएम आहे का असे विचारतो. त्यानंतर रिक्षाचालक इथे दोन एटीएम आहेत, असे उत्तर देतो. त्या दोन्ही एटीएमपैकी एसबीआयचे एटीएम नीट काम करत नाही, असे सांगत स्वतःच्या रिक्षामधून ४०० किलोमीटरवर असणाऱ्या एका एटीएमपर्यंत तरुणाला पोचवतो.

रिक्षाचालक केरळमधील असून अशरफ असे त्याचे नाव आहे, जो परदेशातील या तरुणाशी खूप छान इंग्रजीमध्ये संवाद साधताना दिसून आला आहे. तसेच रिक्षाचालकाने त्यांच्या संवादादरम्यान ब्लॉगरला अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखवण्याची ऑफरदेखील दिली. पण, ब्लॉगरने नकार दिला. पण, रिक्षाचालकाने एटीएमपर्यंत ब्लॉगरला मोफत सेवा प्रदान केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @zakkyzuu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत झक्कीने हा व्हिडीओ शेअर केला आणि चालकाची प्रशंसा करीत कॅप्शन लिहिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala auto driver help uk blogger locate atm and taking fluently replied to foreigner in english watch viral video ones asp