Kerala Accident Viral Video: तुमच्यापैकी अनेकांनी अनेक लोकांकडून ऐकले असेल की जीवन आणि मरण देणे हे वरील व्यक्तीच्या हातात आहे. ‘जाको राखे सायं, मार खाके ना कोये’ असंही आपण ऐकलं आहे. आज व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये या दोन्ही गोष्टी अगदी तंतोतंत बसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका लहान मुलाचा मोठा अपघात झाला आहे, मात्र तो पूर्णपणे सुखरूप बचावला आहे. या अपघातात त्याला एक ओरखडाही येत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेले सीसीटीव्ही फुटेज केरळमधील कन्नूरमधील तालिपरंबाजवळील चोरुकलाचे आहे. फुटेज एकल ट्रॅक रस्ता आहे ज्याच्या दोन्ही बाजूला जंगल आणि झुडुपे आहेत. व्हिडीओमध्ये एक लहान मूल जंगलाच्या मधोमध भरधाव वेगाने सायकलवरून येताना दिसत आहे आणि रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला तो धडकतो. दुचाकीस्वाराची दुचाकीची धडक इतकी जोरदार होते की, मुलागा रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडतो आणि त्याची सायकल मात्र रस्त्याच्या मधोमध पडते. तेव्हाच दुचाकीस्वाराच्या पाठीमागून एक बस भरधाव वेगाने येत असते. मुलगा रस्त्याच्या पलीकडे पडल्यामुळे बसने त्याच्या सायकलला धडक दिली.
(हे ही वाचा: एखाद्या खेळण्याप्रमाणे ही चिमुरडीचा खेळतेय सापाशी! आश्चर्यचकित करणारा Video Viral)
(हे ही वाचा: लहान मुलापासून जीव वाचवण्यासाठीचे सापाचे सर्व प्रयत्न अयशस्वी; धक्कादायक Video Viral)
हा व्हायरल व्हिडीओ केरळमधला आहे. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की हा चित्रपटातील एक सीन आहे पण ही एक खरी घटना आहे. केरळमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक घटना कैद झाली आहे.